देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये

देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
By : | Updated at : 29 Oct 2025 05:49 PM (IST)

Harshvardhan Sapkal Devendra Fadnavis : दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात तहसीलदारांची गाडी फोडली. एकंदरीत जनतेच्या मनात सरकार विरोधात असंतोष असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. कर्जमाफीचं आश्वासन देऊन देखील कर्जमाफी करत नाहीत. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. बच्चू कुडू यांच्याशी आमचे संभाषण झालं आहे.

त्यांच्या मागण्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे सपकाळ म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे चोरी करून मुख्यमंत्री झाल्याची टीकाही सपकाळ यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये सरकारने शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये असेही सपकाळ म्हणाले. महाराष्ट्राला आराजकतेच्या खाईत देवेंद्र फडणवीस यांनी ढकलू नये, तातडीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा फडणवीस सरकारने करावी असे सपकाळ म्हणाले. हे चोरी करुन मुख्यमंत्री झाले आहेत अशी टीका सपकाळ यांनी केली.

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि अत्यंत संयमाने आणि सभ्यतेने वागले पाहिजेत ही आपली परंपरा असल्याचे सपकाळ म्हणाले. 1 नोव्हेंबरला मत चोरीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय मोर्चा 1 नोव्हेंबरला मत चोरीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय मोर्चा असल्याचे सपकाळ म्हणाले. नवनिर्माण सेनेसोबत आघाडी करण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव काँग्रेसकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळं या प्रश्नाचे उत्तर देण्याची आवश्यकता नाही असे सपकाळ यावेळी म्हणाले. सरकारच्या विरोधात जनतेत मोठा असंतोष सरकारच्या विरोधात जनतेत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

सरकारनं कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्यापही सरकारने कर्जमाफी केली नसल्याचे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. आम्ही शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय घेतला आहे. सध्या जनतेचा उद्रेक होताना दिसत आहे.

फडणवीस हे चोमू मुख्यमंत्री आहेत. ते मत चोरुन मुख्यमंत्री झाल्याची टीका यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पिकाबरोबर जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

चअनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत देखील मिळाली नाही. तसेच कर्जमाफीचे आ्सानसन सरकारने दिले होते. अद्याप देखील सरकारनं याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं राज्यातील शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत.

📚 Related News