VIDEO : भाऊ कदमकडून खूप शिकलो, मनोज बाजपेयींकडून स्तुतीसुमने; काय काय म्हणाला?

VIDEO : भाऊ कदमकडून खूप शिकलो, मनोज बाजपेयींकडून स्तुतीसुमने; काय काय म्हणाला?
By : | Updated at : 09 Sep 2025 06:36 PM (IST)

Manoj Bajpayee on Bhau Kadam : "मी भाऊ कदम यांना 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात पहिल्यांदा पाहिलं होतं. भाऊ कदम यांच्याकडून मी खूप शिकलोय. कारण भाऊ कदम नेहमी आमच्यासोबत होते. भाऊ कदम शांत बसतात, काही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांची तयारी तुम्हाला दिसत नाही. तो असा माणूस आहे, जेवढा वेळ तो शूटिंगवर असतो, त्याचं डोकं नेहमी काहीतरी विचार करत असतं. एकाच डायलॉगचे अनेक वर्जन तो माणूस तयार करत असतो. कारण ते इतके शांत आहेत, त्यामुळे शेजारच्या कोणालाही कळणार नाही की, ते फार विचार करतात. ते त्यांच्या कामाविषयी फार सिरीयस असतात. ते फार टॅलेंटेड आणि इंटेलिजंट आहेत", असं बॉलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी म्हणाले आहेत. ते एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाऊ कदम यांचं कौतुक केलं.

‘इन्स्पेक्टर झेंडे’ नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला, सिनेमाची तुफान चर्चा

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ‘इन्स्पेक्टर झेंडे’ ही या आठवड्यातील सर्वात चर्चेत असलेला सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी दिग्दर्शित केली असून, दिग्दर्शक म्हणून ही त्यांची पहिलीच फिल्म आहे. चित्रपट हा पोलिस अधिकारी माधुकर झेंडे यांच्या खऱ्या कहाणीवर आधारित आहे. झेंडे हेच ते अधिकारी आहेत ज्यांनी गुन्हेगार चार्ल्स शोभराज याला दोन वेळा पकडलं होतं – पहिल्यांदा 1971 मध्ये आणि पुन्हा एकदा 1986 मध्ये गोवा येथे, जेव्हा तो तिहार तुरुंगातून फरार झाला होता. झेंडेंची भूमिका अभिनेता मनोज बाजपेयी साकारत आहेत. तर शोभराजचं नाव बदलून चित्रपटात कार्ल भोजराज ठेवलं आहे आणि ही भूमिका अभिनेता जिम सर्भ यांनी केली आहे.

‘इन्स्पेक्टर झेंडे’ सिनेमाची स्टोरी काय?

चित्रपटाची सुरुवातच कार्ल भोजराजच्या गुन्हेगारी जगत आणि त्याच्या खास अंदाजाने होते. हा माणूस इतका चलाख आणि स्मार्ट दाखवला आहे की लोक सहजपणे त्याच्या बोलण्याला भुलून जातात. पण मग एंट्री होते इन्स्पेक्टर झेंडे यांची – साधासुधा दिसणारा पण अत्यंत चाणाक्ष मेंदू असलेला पोलीस अधिकारी. त्यांच्यात आणि भोजराजमध्ये सुरु होतो पकडापकडी आणि बचावाचा खेळ, ज्यात अनेक रंजक वळणे येतात. चित्रपटात 70 आणि 80 च्या दशकातील काळ देखील प्रभावीपणे उभा केला आहे, जेव्हा गुन्हेगारी आणि पोलिसांच्या जगाचा अंदाज अगदी वेगळा होता. खऱ्या घटनांशी संबंधित काही सुगावेही दाखवले आहेत – जसे मोटारसायकलविषयी मिळालेली माहिती आणि एका स्थानिकाने दिलेले हे विधान की, बाइक चालवणारा गोऱ्या रंगाचा युरोपियन होता. हेच तपशील कथेला अधिक रंगतदार बनवतात.

इतर महत्त्वाच्या बातम्या

📚 Related News