Mehul Pai On Lalbaug Cha Raja Visarjan 2025: 'कर्माची फळ लगेच परत मिळतात...'; मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्यानं 'लालबाग राजा'च्या कार्यकर्त्यांना फटकारलं

Mehul Pai On Lalbaug Cha Raja Visarjan 2025: 'कर्माची फळ लगेच परत मिळतात...'; मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्यानं 'लालबाग राजा'च्या कार्यकर्त्यांना फटकारलं
By : | Updated at : 10 Sep 2025 11:45 AM (IST)

Abhidnya Bhave Husband Mehul Pai On Lalbaug Cha Raja Visarjan 2025: संपूर्ण राज्यभरात थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच सर्वांनी बाप्पााला भावपूर्ण निरोप दिला. थाटामाटात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची साद घालण्यात आली. पण, यंदा नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला 'लालबागचा राजा' मात्र विसर्जनासाठी कित्येक तास ताटकळल्याचं पाहायला मिळालं. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली, पण विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तराफ्यावर मात्र लालबाग राजाची मूर्ती चढवण्यास मंडळाला अपयश आलं. परिणामी एकीकडे तराफा आणि दुसरी लालबागच्या राजाची मूर्ती समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात कित्येक तास समुद्रात तशीच होती.

'लालबागचा राजा'च्या विसर्जनावेळी झालेल्या गोंधळावरुन सोशल मीडियावर मंडळाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मंडळाच्या कार्यकर्त्यांचे, राज्याच्या दर्शनाला येणाऱ्या व्हिआयपींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. त्यावरुन मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सुरू झालं. अनेकांनी मंडळाच्या लोकांना आरसा दाखवण्याचं काम केलं. परिसरातील प्रचंड गर्दी, भाविकांना झालेल्या धक्काबुक्कीचे व्हिडिओ, व्हीआयपी रांगेतून दर्शन घेणाऱ्यांना मिळालेली VIP वागणूक आणि विसर्जनासाठी लागलेले 33 तास अशा अनेक बाबींमुळे यंदा हे मंडळ चर्चेत राहिलं. अशातच मराठी अभिनेत्र अभिज्ञा भावेच्या नवऱ्यानंह लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी झालेल्या गोंधळावरुन एक पोस्ट लिहिली आहे. तसेच, मंडळावर ताशेरेही ओढले आहेत.

अभिज्ञा भावेचा नवरा मेहुल पै सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हणाला?

मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेचा नवरा मेहुल पै यानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणाला की, "लालबागचा राजा, मंडळ आणि विसर्जनाची एकंदर अपयशता. इतकं मोठं मंडळ, हातात अफाट पैसा... एका बाजूला व्हीआयपी लोकांना प्राधान्य देऊन विशेष दर्शनाची सोय, आणि दुसऱ्या बाजूला सामान्य भक्तांना धक्काबुक्की. मारहाण आणि अपमान - हेच त्या मंडळाचं खऱ्या चेहऱ्यावरचं आरसपानी प्रतिबिंब दिसलं. इतकंच नाही, तर कोळी बांधवांना दर्शन नाकारून त्यांचा अपमानही करण्यात आला."


Mehul Pai On Lalbaug Cha Raja Visarjan 2025: 'कर्माची फळ लगेच परत मिळतात...'; मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्यानं 'लालबाग राजा'च्या कार्यकर्त्यांना फटकारलं

"पण राजा तो राजा असतो, आणि तो सर्वांचा असतो! अनंत चतुर्दशीला हे अगदी स्पष्ट झालं, जेव्हा राजा अधांतरी पाण्यात विसर्जनासाठी उभा होता, तेव्हा त्याच्या शेजारी त्याच्या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते नव्हते; तर कोळी बांधव तब्बल 12 तास त्याच्यासोबत खंबीरपणे उभे होते. शेवटी रात्री 10 वाजता कोळी बांधवांच्या मदतीनेच विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि राजा आपल्या गावी परत गेला. मात्र जे दृश्य डोळ्यांना दिसलं, राजा पाण्यात पाठ फिरवून उभा असताना ते मनाला पिळवटून टाकणारं, अतिशय वेदनादायी होतं. आता तरी या मंडळाने समजून घ्यायला हवं की भेदभाव हा भक्तीचा भाग नसतो.", असं मेहुल पै म्हणाला.

आपल्या पोस्टच्या शेवटी, "धडा - आज कर्मही 5G नेटवर्कवर आहे, त्यामुळे कर्माची फळ लगेच परत मिळतात. लालबागच्या राजाचा विजय असो.", असं म्हणून त्यानं मंडळाचे कानही टोचले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

📚 Related News