Surya Grahan 2025 : वैदिक शास्त्रानुसार, नुकतंच वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण पार पडलं. त्यानुसार, 2025 या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण पितृपक्षाच्या शेवटच्या अमावस्येला पार पडणार आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्य कन्या राशीत असणार आहे. या दिवशी राशीनुसार दान पुण्य मिळणार आहे. सूर्यग्रहणाला धार्मिक महत्त्व नाहीये. पण, ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने याचा प्रभाव फार प्रभावी असतो. याचा काही राशींवर चांगला तर काही राशींवर वाईट परिणाम होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहणाच्या दिवशी शनी आणि राहूची स्थिती फार खास असणार आहे. राहू सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. तर, शनी सध्या मीन राशीत विराजमान आहे. याचा प्रभाव अनेक राशींवर दिसून येणार आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी लागणाऱ्या ग्रहणाची सुरुवात रात्री 11 वाजल्यापासून सुरु होणार आहे. तर, सकाळी 3 वाजून 24 मिनिटांपासून हे ग्रहण चालणार आहे. हे सूर्यग्रहण न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया, अंटार्टिका आणि अटलांटिक महासागरात लागणार आहे.
'या' राशींना राहावं लागेल सावध
ग्रहणामुळे मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच, या काळात सावधान राहण्याची गरज आहे. पैशांची गुंतवणूक करण्याआधी विचारपूर्वक निर्णय घ्या. जर नुकसान होऊ नये असं वाटत असेल तर धैर्याने काम करण्याची गरज आहे.
सूर्यग्रहणाचा या राशींवर होणार शुभ परिणाम
सूर्यग्रहणाचा हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. हे सूर्यग्रहण वृषभ, सिंह, तूळ आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी शुभकारक असणाप आहे. या काळात तुम्ही केलेल्या पैशांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, जर तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु इच्छित असाल तर तुम्हाला त्यातून लाभ मिळेल. या काळात जे लोक अविवाहित आहेत त्यांना शुभवार्ता मिळेल.