Who Is Most Clever Star Of Bollywood: फिल्म इंडस्ट्रीचा सर्वात चतुर स्टार कोण? दिग्गज दिग्दर्शकानं क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' खानचं नाव

Who Is Most Clever Star Of Bollywood: फिल्म इंडस्ट्रीचा सर्वात चतुर स्टार कोण? दिग्गज दिग्दर्शकानं क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' खानचं नाव
By : | Updated at : 10 Sep 2025 09:55 AM (IST)

Who Is Most Clever Star Of Bollywood: दिग्दर्शिका आणि अभिनेत्री दिव्या खोसला (Actress Divya Khosala) लवकरच 'एक चतुर नार' (Ek Chatur Naar) नावाच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती एका धूर्त राखाडी रंगाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचं हे पात्र असं आहे, जे दिव्यानं यापूर्वी कधीही साकारलेलं नाही. आतापर्यंत गोड आणि उत्कृष्ट प्रतिमा असलेली दिव्या या चित्रपटात एका वेगळ्या प्रकारच्या भूमिकेत दिसणार आहे.

एनडीटीव्हीला दिलेल्या एका खास मुलाखतीत, दिव्या खोसला आणि चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला (Director Umesh Shukla) यांना विचारलं गेलं की, फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात हुशार स्टार कोण? तेव्हा दिव्या खोसलानं कोणाचंही नाव घेऊ शकली नाही. परंतु चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी या प्रश्नाचं स्पष्टीकरण देऊन थेट एका खानचं नाव घेतलं आणि सर्वांचीच मनं जिंकली.

फिल्म इंडस्ट्रीचा सर्वात हुशार स्टार कोण?

दिग्दर्शक उमेश शुक्ला म्हणाले की, शाहरुख खान हा फिल्म इंडस्ट्रीचा सर्वात हुशार स्टार आहे. कारण त्यानं त्याच्या कामात विविधता आणली. तो केवळ अभिनयातच गुंतलेला नाही तर चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध व्यवसायांमध्येही काम करतो. त्याची बुद्धिमत्ता आणि व्यावसायिक जाणीव पाहता असं म्हणता येईल की, शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा चित्रपट उद्योगातील सर्वात हुशार स्टार आहे.

'एक चतुर नार' कधी रिलीज होणार?

दिव्या खोसला आणि नील नितीन मुकेश अभिनीत 'एक चतुर नार' हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट लखनौच्या झोपडपट्टी भागांत चित्रित करण्यात आला होता आणि तो वास्तववादी ठेवण्यासाठी, अभिनेत्री दिव्या खोसला स्वतः 6 दिवस झोपडपट्टीत राहिली. त्या काळात तिनं सर्वांशी इतक्या गप्पागोष्टी केल्या की, लोक तिला चहासाठी आपल्या झोपड्यांमध्ये यायला आमंत्रण देऊ लागले, असं अभिनेत्रीनं सांगितलं.

दिव्या खोसलानं सांगितलं की, शूटिंग दरम्यान तिला 6 दिवस झोपडपट्टीत राहावं लागलं. या काळात स्वच्छतेची समस्या निर्माण झाली. त्यामुळे तिच्या डोक्यात उवा आलेल्या. शूटिंगनंतर तिला त्यासाठी ट्रिटमेंट घ्यावी लागली. दरम्यान, दिव्या खोसलाचा हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

📚 Related News