स्वतःवर गोळी झाडून तरुणानं संपवलं जीवन, विवाहबाह्य संबंधातून कृत्य केल्याची माहिती, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं

स्वतःवर गोळी झाडून तरुणानं संपवलं जीवन, विवाहबाह्य संबंधातून कृत्य केल्याची माहिती, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं
By : | Updated at : 09 Sep 2025 06:31 PM (IST)

Solapur : (Solapur) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील सासुरे येथे एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडून केल्याची घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधातून तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तो जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

आज सकाळपासून एक काळ्या रंगाची चारचाकी शेतात उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गोविंद बर्गे हे मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांना गाडीतच एक पिस्तूल देखील आढळून आली असून त्यातूनच स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून आत्महत्येचे नेमके कारण काय? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. गोविंद बर्गे याने स्वतःवर गोळी झाडून घेतली की अन्य काही घडले या दृष्टीने देखील पोलीस सध्या तपास करत आहेत.

📚 Related News