Manoj Bajpayee On Marathi Actor Bhau Kadam: 'भाऊ कदम खूप हुशार, टॅलेंटेड... त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं'; मनोज वाजपेयींकडून कौतुकाची थाप

Manoj Bajpayee On Marathi Actor Bhau Kadam: 'भाऊ कदम खूप हुशार, टॅलेंटेड... त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं'; मनोज वाजपेयींकडून कौतुकाची थाप
By : | Updated at : 10 Sep 2025 12:58 PM (IST)

Manoj Bajpayee On Bhau Kadam: बॉलिवूडमधल्या (Bollywood News) काही गुणी अभिनेत्यांमध्ये आवर्जुन समाविष्ट होणारं नाव म्हणजे, मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee). 'इन्स्पेक्टर झेंडे' (Inspector Zende) या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमामुळे मनोज वाजपेयी चर्चेत आहेत. या सिनेमात मनोज वाजपेयींसोबत मराठमोळे अभिनेते भाऊ कदम (Marathi Actor Bhau Kadam) यांनी स्क्रिन शेअर केली आहे. नुकत्याच एका मुलातीत बोलताना मनोज वाजपेयींनी भाऊ कदम (Bhau Kadam) यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

'चला हवा येऊ द्या'मधून आपल्या विनोदी शैलीनं घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे, भाऊ कदम. आपली मेहनत, उत्तम अभिनय आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्याच्या ताकदीच्या जोरावर भाऊ कदम यांनी मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. 'इन्स्पेक्टर झेंडे' या हिंदी सिनेमात भाऊ कदम यांनी मनोज वाजपेयींसोबत स्क्रिन शेअर केली आहे. भाऊ कदमकडून मला खूप शिकायला मिळालं, असं म्हणत मनोज वाजपेयींनी भाऊ कदम यांचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच, भाऊ कदम खूप हुशार आणि टॅलेंटेड आहे, असंही मनोज वाजपेयी म्हणाले आहेत.

भाऊ कदम (Bhau Kadam) यांच्याबाबत काय म्हणाले मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee)?

मनोज वाजपेयी म्हणाले की, "भाऊ कदमला मी 'चला हवा येऊ द्या'मध्ये पाहिलं होतं. या सिनेमामुळे मला भाऊ कदमकडून खूप काही शिकायला मिळालं. शूटिंगमध्ये ते नेहमी आमच्यासोबत असायचे. असं वाटतं की, ते काही बोलत नाहीत... गप्प असतात. त्यामुळे त्यांची तयारी दिसत नाही. पण ते एक असे अभिनेता आहेत, ते जितका वेळ शूटिंगमध्ये असतात. त्यांच्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतं. एकाच डायलॉगचे खूप व्हर्जन ते तयार करून बघतात. ते इतके शांत आहेत की, आजूबाजूच्या कोणालाच कळत नाही. सगळ्यांना असं वाटतं की ते आले आणि डायलॉग बोलले. पण, ते खूप विचार करत असतात. ते त्यांच्या कामाकडे खूप गंभीररित्या पाहतात. ते उभे राहिले आणि लोक हसायले लागले असं होत नाही. भाऊ कदम खूप हुशार आणि टॅलेंटेड आहे."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

📚 Related News