Ranjitsingh Naik Nimbalkar: डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुषमा अंधारेंनी आरोपांची राळ उडवली, रणजितसिंह निंबाळकरांचा समर्थकांना आदेश, म्हणाले....

Ranjitsingh Naik Nimbalkar: डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुषमा अंधारेंनी आरोपांची राळ उडवली, रणजितसिंह निंबाळकरांचा समर्थकांना आदेश, म्हणाले....
By : | Edited By: Rohit Dhamnaskar | Updated at : 30 Oct 2025 09:09 AM (IST)

Ranjitsingh Naik Nimbalkar:फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्या विरोधकांच्या रडारवर आहेत. मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) यांनी फलटणमध्ये येऊन रणजितसिंह नाईक निंबाळकरांना (Ranjitsingh Naik Nimbalkar) क्लीन चिट देऊन टाकली होती. तरीही विरोधकांच्या निंबाळकरांविरोधातील आरोपांची धार कमी झालेली नाही. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि शरद पवार गटाचे मेहबुब शेख यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येशी रणजितसिंह निंबाळकर यांचा संबंध असल्याचा दावा केला होता. यानंतर रणजितसिंह निंबाळकर यांचे समर्थक आक्रमक झाले होते.

त्यांनी सोशल मिडीयावरुन सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या आणि एकेरी भाषेत टीका सुरु केली होती. एक निंबाळकरांच्या एका समर्थकाने मेहबुब शेख यांना फोनवरुन शिवीगाळ केली होती. या पार्श्वभूमीवर आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या समर्थकांना सबुरीचा सल्ला दिला आहे. (Phaltan Doctor girl suicide) गेले काही दिवस माझ्यावर वेगवेगळ्या माध्यमातून आरोपांची राळ उठवली जात आहे. जे लोक आरोप करत आहेत, त्यांचा यामध्ये काही दोष नाही.

पण चुकीच्या माहितीद्वारे माझ्यावर आरोप होत आहेत. पण माझी आपल्याला कळकळीची विनंती ज्या पद्धतीने मी काही ऑडिओ ऐकले, मग ते राष्ट्रवादीचे नेते मेहबुब शेख असतील किंवा अंधारे ताई यांच्याबद्दल एकेरी पद्धतीची वाक्यरचना असणारी टीका करु नका. कृपया माझी विनंती आपण त्यांच्याशी संवैधानिक भाषेने लढू. कायदेशीर पद्धतीने त्यांना उत्तर देऊ. अयोग्य पद्धतीने त्यांच्यावर टीका करु नये अशी माझी सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे.

आपली संस्कृती, आपली परंपरा आपल्याला टिकवायची आहे. आपल्याला बदला घ्यायचा नाही, बदलाव करायचा आहे. गेल्या एक वर्षात आपण जे काम केलं आहे , त्याला अनुसरुन आपलं वागण असावं, असे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्हिडीओत म्हटले आहे. Sushma Andhare: रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या वकिलाची सुषमा अंधारेंना नोटीस रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वकील धीरज घाडगे यांनी नुकतीच सुषमा अंधारे यांना नोटीस पाठवली होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.

याबद्दल त्यांनी 48 तासांमध्ये प्रसारमाध्यमांसमोर लेखी माफीनामा सादर करावा. अन्यथा 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले होते. सुषमा अंधारे यांनी हे आव्हान स्वीकारत निंबाळकरांच्या वकिलांना नीट अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता. आणखी वाचा.

📚 Related News