Pitru Paksha 2025 : सर्वपित्री अमावस्येला पितर होतील प्रसन्न; सर्व 12 राशींनुसार 'हे' उपाय ठरतील लाभदायी, वाचा ज्योतिषशास्त्र

Pitru Paksha 2025 : सर्वपित्री अमावस्येला पितर होतील प्रसन्न; सर्व 12 राशींनुसार 'हे' उपाय ठरतील लाभदायी, वाचा ज्योतिषशास्त्र
By : | Updated at : 11 Sep 2025 10:46 AM (IST)

Pitru Paksha 2025 : गणेशोत्सवानंतर पितृपक्ष पंधरवड्याला सुरुवात झाली. 2025 या वर्षात 7 ते 21 सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष पंधरवड्याचा हा काळ असणार आहे. तर, शेवटच्या दिवशी म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. या दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण देखील लागणार आहे. त्यामुळे सर्व 12 राशींसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या ठिकाणी डॉ. भूषण ज्योतिर्विद यांच्या माहितीनुसार आपण सर्व 12 राशींनी सर्वपित्री अमावस्येला कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊयात.

12 राशीनुसार सर्वपित्री अमावस्या उपाय

मेष रास (Aries Horoscope)

पूर्वजांना गूळ आणि लाल फुलांचे तर्पण करा.
मंदिरेत तांदूळ आणि मसूर डाळ दान करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

पितरांसाठी दूध, तूप, पांढरी मिठाई अर्पण करा.
गाईला हिरवा चारा द्या.

मिथुन रास (Gemini Horoscope)

पितरांना हिरव्या मूग डाळीचे तर्पण करा.
लहान मुलांना पुस्तके किंवा लेखनसामग्री दान करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

पितरांना पांढरे फुल, दूध व तांदळाने तर्पण करा.
गरीब महिलांना पांढरे वस्त्र किंवा मिठाई द्या.

सिंह रास (Leo Horoscope)

गूळ, तूप, लाल कपड्यांचे तर्पण करावे.
ब्राह्मणांना अन्नदान करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

हिरवा मूग, पान, सुपारी पितरांना अर्पण करा.
गरजू व्यक्तींना औषध किंवा औषधी वनस्पती द्या.

तूळ रास (Libra Horoscope)

पितरांना दही, फुलं, तूप व श्वेत पुष्प द्या.
कन्यादानासारखे कार्य किंवा गरीब मुलींना कपडे द्या.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

काळे तीळ, गूळ व पाण्याने तर्पण करा.
नाग देवतेला दूध अर्पण करून पितरांना स्मरण करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

पिवळे फुल, गूळ, चणा डाळ पितरांना अर्पण करा.
ब्राह्मणांना पुस्तक, गीता किंवा धार्मिक ग्रंथ दान करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

तीळ, काळे वस्त्र, पाण्याने तर्पण करा.
कामगार, गरीब यांना अन्नदान करा.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

निळे फुल, काळा उडीद डाळ, पाणी अर्पण करा.
रुग्णालयात औषधे किंवा पाणी दान करा.

मीन रास (Pisces Horoscope)

पिवळा पुष्प, तांदूळ, दही पितरांना अर्पण करा.
मंदिरात दीपदान करा.

सर्व राशींसाठी सामान्य उपाय

पूर्वजांच्या स्मरणार्थ तर्पण, पिंडदान करावे.
गाई, कुत्रा, कावळा, मासा, मुंग्या यांना अन्न देणे अत्यंत पुण्यकारक.
गरीबांना अन्न, वस्त्र, दक्षिणा दान करावी.
ॐ पितृभ्यः नमः हा मंत्र जपावा.

डॉ. भूषण ज्योतिर्विद

📚 Related News