Raju Shetti petition in Kolhapur Circuit Bench: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जे रस्ते निकृष्ठ व खराब झाले असतील त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नसल्याने कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करावी, अशी याचिका मुबंई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी दाखल केली आहे. बेंचकडून ाचे मुख्य सचिव, रस्ते विकास प्राधिकरणाचे सचिव, कोल्हापूर , सांगली , सातारा व पुणे जिल्हाधिकारी यांना पुढील सुनावणीस हजर राहण्याबाबत नोटीस लागू करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर सर्किट बेंचकडून मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती शर्मिला देशमुख व न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक या खंडपीठाकडून प्राधिकरणासह वरील सर्व विभागांना पुढील सुनावणीस हजर राहण्याबाबत नोटीसा लागू करण्यात आल्या आहेत. सदर याचिकेमध्ये राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, रस्ते विकास प्राधिकरणाचे सचिव त्याबरोबरच कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी केले आहे.
तोपर्यंत टोल आकारणी न करण्याची मागणी
या पार्श्वभुमीवर राजू शेट्टी यांनी कोल्हापूर ते पुणे हा महामार्ग अत्यंत निकृष्ठ झालेला असून जोपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल आकारणी न करण्याची मागणी खंडपीठात केली आहे.
खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात
कोल्हापूर ते पुणे या 240 किलोमीटरच्या महामार्गावर प्रवास करण्यासाठी ज्याठिकाणी 3 तासात पोहचणे अपेक्षित असताना सध्या 7 तास लागत आहेत. खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होवू लागले आहे. पावसाळ्यात प्रवास करताना अनेक मोठे अपघात झाले असून वाहतूकदारांना प्रचंड मनस्ताप होवू लागला आहे. सध्या कोल्हापूर ते पुणे या महामार्गावर दैनंदिन दीड ते दोन कोटी रूपयांची टोल वसुली केली जात आहे. मात्र, वाहतूकदारांना सुविधा कोणत्याच दिल्या जात नाहीत. सदर याचिकेच्या निर्णयामुळे , , व या जिल्ह्यातील प्रवाशांना व वाहतूकदारांना दिलासा मिळणार असून या मार्गावर प्रवास करणा-यांच्या नजरा आता या याचिकेच्या निकालाकडे लागल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या