IND vs PAK Asia Cup 2025 : 5 फलंदाज, 3 अष्टपैलू, 3 गोलंदाज... सूर्याने आखला पाकिस्तानविरुद्ध मोठा डाव! 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

IND vs PAK Asia Cup 2025 : 5 फलंदाज, 3 अष्टपैलू, 3 गोलंदाज... सूर्याने आखला पाकिस्तानविरुद्ध मोठा डाव! 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
By : | Updated at : 11 Sep 2025 08:12 PM (IST)

IND vs PAK Asia Cup 2025 : यूएईविरुद्ध टीम इंडियाने नोंदवलेला सुपरफास्ट विजय पाहिल्यानंतर आता सगळ्यांची नजर पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या हाय-वोल्टेज लढतीकडे लागली आहे. यावेळी रविवार हा ‘सुपर संडे’ ठरणार आहे, कारण आशिया कपच्या या घमासानात भारतासमोर पाकिस्तान उभा असणार आहे. 14 सप्टेंबरला रंगणाऱ्या या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 बाबत मोठा इशारा मिळाला आहे. मिळालेल्या संकेतांनुसार पाकिस्तानविरुद्ध 5 फलंदाज, 3 अष्टपैलू खेळाडू आणि 3 गोलंदाज अशी भारताची संघरचना असू शकते.

अजय जडेजाने पाकिस्तानविरुद्धची प्लेइंग XI सांगितली! (Ajay Jadeja revealed Playing XI against Pakistan)

आता प्रश्न असा आहे की, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचे कोणते चेहरे मैदानात उतरणार? भारताचे माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांच्या मते पाकिस्तानविरुद्धही तीच टीम खेळताना दिसेल, जी UAE विरुद्ध उतरली होती. म्हणजेच संघात कोणताही बदल होणार नाही. अजय जडेजा यांनी ही गोष्ट भारताचा UAE विरुद्धचा सामना सुरू होण्याआधी आशिया कपच्या ब्रॉडकास्ट चॅनेल सोनी नेटवर्कवर सांगितली होती.

अजय जडेजा यांनी युएईविरुद्ध भारताच्या प्लेइंग इलेव्हनवर चर्चा करताना आपले मत मांडले होते. त्यांनी म्हटले होते की, UAE विरुद्ध भारताने 8 फलंदाजांना उतरवायला नको होते. पण जर तसे केले आहे, तर मग पाकिस्तानविरुद्ध जी टीम खेळणार आहे, ती तुम्ही आज पाहिली. म्हणजेच, UAE विरुद्ध खेळलेली टीमच पाकिस्तानविरुद्धही खेळणार आहे.

पाकिस्तानविरुद्ध 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग-11?

आता जर तीच युएई संघ खेळणार असेल, तर ही पाकिस्तानविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन असू शकते.

  • फलंदाज - शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक).
  • अष्टपैलू - हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल
  • गोलंदाज - कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

आशिया कप 2025 साठी टीम इंडियाचा संघ - (Team India Squad For Asia Cup 2025)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, संजू सॅमसन, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.

आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ (Pakistan name squad for upcoming Asia Cup)

सलमान अली आघा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमां, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहबजादा फरहान, सैम अय्यूब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी आणि सुफियान मुकिम.

📚 Related News