Prithiv Shaw Akriti Agarwal Video : भारतीय क्रिकेट संघापासून बराच काळ दूर असलेला ओपनर पृथ्वी शॉ सध्या पुनरागमनाचा मार्ग शोधत आहे. नुकतेच त्याने बुची बाबू स्पर्धेत ाचे प्रतिनिधित्व केले होते. स्पर्धा संपताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शॉची रूमर्ड गर्लफ्रेंड आकृती अग्रवाल हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून चाहत्यांनी पुन्हा दोघांच्या रिलेशनवर चर्चा सुरू केली असून, बरेच जण आता त्यांच्या नात्याला ‘कन्फर्म’ मानू लागले आहेत.
पृथ्वी शॉचा गर्लफ्रेंडसोबतचा ‘क्वालिटी टाइम’ व्हायरल
व्हिडिओची सुरुवात कारमधून होते, ज्यात गाडी पृथ्वी चालवत असतो, तर आकृती मेकअप करताना दिसते. ती हसत-हसत म्हणते की, “चलत्या गाडीत मेकअप करणे किती कठीण आहे.” दोघं लोणावळा ट्रिपला निघाले होते. थोडं खाऊन वॉकला जाणं, डान्स, मजामस्ती असं सगळं या व्हिडिओमध्ये कैद झालं आहे.
मस्तीच्या दरम्यान शॉ गंमतीत म्हणतो की, “मी साईन करून घेतलंय, हिला काही झालं तर माझी जबाबदारी नाही.” त्यावर आकृती हसत उत्तर देते की, “किती वाईट आहेस तू!” पुढे दोघे आर्चरी खेळताना दिसतात. आकृती सांगते की, आर्चरी माझ्यासाठी कठीण होतं, पण पृथ्वीला अगदी सोपं वाटलं. पुढे दोघांनी अनेक मजेदार ऍक्टिव्हिटीज केल्या ज्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे.
कोण आहे आकृती अग्रवाल?
लखनौमध्ये जन्मलेली आकृती अग्रवाल हिने तील निर्मला मेमोरियल कॉलेजमधून शिक्षण घेतलं. सुरुवातीला तिने कंटेंट क्रिएटर म्हणून कारकीर्द सुरू केली. रिलेटेबल शॉर्ट व्हिडिओ आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे तिने इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर खास ओळख निर्माण केली. सध्या तिच्या यूट्यूबवर 70,000 पेक्षा जास्त सब्स्क्राइबर्स आहेत. तिची आगामी फिल्म त्रिमुखा लवकरच रिलीज होणार आहे आणि ही फिल्म तिला बॉलिवूडच्या मेनस्ट्रीममध्ये स्थान मिळवून देईल, अशी चर्चा आहे.
याआधी पृथ्वी शॉचे नाव मॉडेल निधी तपाडिया सोबत जोडले गेले होते. निधीने काही पोस्ट शेअर करून ब्रेकअपची हिंट दिली होती. त्यानंतर शॉ-निधीचं नातं संपल्याचं बोललं जाऊ लागलं. आता आकृतीसोबत पृथ्वीच्या वाढत्या जवळीकीमुळे चाहत्यांना खात्री पटली आहे की, या दोघांचं रिलेशन आहे.