Mumbai: राज्यातील खेळाडूंना अधिक चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात आणि ाच्या क्रीडा संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन क्रीडा धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयातील समिती कक्षात आज आयोजित बैठकीत त्यांनी हा महत्वाचा निर्णय जाहीर केला.
या बैठकीत बारामती तालुक्यातील कटफळ येथे प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलाचा आराखडा सादर करण्यात आला. अजित पवार यांनी हा आराखडा पाहून आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सर्व जिल्हा, तालुका आणि विभागीय क्रीडा संकुले अद्ययावत केली पाहिजेत. खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक साधनं-सुविधा, आणि उत्तम वातावरण मिळालं पाहिजे.
राज्यातील खेळाची मैदानं अद्ययावत करा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात त्यांच्या समिती कक्षात क्रीडा विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कटफळ ता. बारामती येथे प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलाच्या आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. अद्ययावत आणि अनुरूप क्रीडा सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. राज्यातील सर्व क्रीडा संकुले अद्ययावत करावीत. खेळाडूंना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा, साधन-सामग्री उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात यावे, विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुल समितीची पुनर्रचना करावी,असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
या बैठकीत वेगवेगळ्या देशांमधील आणि भारतातील विविध राज्यांतील क्रीडाविषयक सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच, सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) यांचा क्रीडा क्षेत्रात प्रभावी उपयोग कसा करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीस क्रीडामंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) श्रीमती शैला ए.,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख हे मंत्रालयातून तर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त शीतल तेली - उगले,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
हेही वाचा