मुंबई : बंजारा, धनगर कैकाडी, छोटे घटक असतील ह्या सगळ्यांच्या वेदनांसाठी त्रास दिला जातोय. जरांगेनं एक शासन निर्णय आणायला लावला तो कसा संविधानाविरोधात आहे, ह्या संबंधित बाबी घेत आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. मराठा आरक्षणाल विरोध करत, मुंबईतील मराठा आंदोलकांच्या विरोधात भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या यांनी महसूलमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ओबीसींच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर सदावर्तेंनी बावनकुळे यांची भेट घेत हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षणावर चर्चा केली. तसेच, राज-उद्धव भेटीवर देखील
बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाली आहे, ओबीसींना एक भीती दाखवली जाते आहे. प्रमाणपत्र आमच्या दमावर मिळवू असे म्हणतात. महसूल अधिकारी एका विशिष्ट समाजाच्या मनी पॉवरला घाबरत आहेत. त्यामुळे, ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचे गंडांतर येऊ नये म्हणून बावनकुळे यांना विनंती केल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं. तर, वरीष्ठ अधिकाऱ्यांना बावनकुळे यांनी विनंती केली, जोपर्यंत फॅमिली टीमध्ये कुणबी दिसत नाही आणि कागदपत्रांची पूर्तता होत नाही तोपर्यंत प्रमाणपत्र देऊ नका, हे सरकार ओबीसींचे देखील आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.
अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ
रुल 2012 अंमलात आला आहे, शेवटच्या यादीला मच्छिमार बांधवांना सांगतोय. तीन आठवड्यात महसूलमंत्र्यांनी अहवाल मागितला आहे. महसूल अधिकाऱ्यांनी गांभीर्य लक्षात ठेवावे. कोणी बोललं मी मोठा आहे, अमुक आहे तमुक आहे तर कोणी तसंच प्रमाणपत्र देऊ नये. जशी फवारणी केली जाते तशी डरची फवारणी आम्ही करुन घेतली आहे. त्यासाठी, मंत्री महोदयांना विनंती केली आहे, तातडीनं पाऊले उचलावीत अन्यथा आम्ही कोर्टात देखील जाऊ. दरम्यान, मंत्रिमहोदयांनी तीन दिवसात स्वयंस्पष्ट अहवाल द्यायला सांगितले आहे. आम्ही महसूलच्या न्यायालयात आलोय, असे म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
गुन्हे मागे घेतल्यास न्यायालयात बोलवू
राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पोलिस खाते देखील आहे का? असं वाटायला लागलं आहे. नुकसान झालेल्या गोष्टींचे गुन्हे मागे घ्यायला सांगितले आहे. राधाकृष्ण तुम्ही तिथे राहू शकता का? तुम्ही गृहखाते पण हातात घेतले की काय असं वाटायला लागलं आहे. उपोषण सोडतेवेळी समाज कल्याणचे मंत्री हे का नव्हते हा देखील प्रश्न आहे? असे सदावर्ते यांनी म्हटले. मनोज कसं आहे, स्वत:चे धंदे रेती टिप्परचे असतील रे बाबा. पण, एकही प्रकरणात गुन्हे मागे दाखवू द्या, विखे पाटील यांना न्यायालयात बोलवण्याची विनंती करु. पाटील आहेत म्हणून लागू होत नाही, राधाकृष्ण आहात तुम्ही, असे म्हणत सदावर्ते यांनी गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयालाही विरोध दर्शवला आहे.
ठाकरे बंधू म्हणजे दोन नापास लोकं
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही सदावर्तेंनी आपली भूमिका मांडली. मनोज जरांगेच्या आंदोलनावेळी त्यांचे हाताची घडी तोंडावर बोट होते, दोन राजकीय नापास लोकं एकत्र आल्याने राजकीय यश मिळत नाही, अशी टीका सदावर्तेंनी ठाकरे बंधूंवर केली.