काठमांडू : भारताचा शेजारी असलेल्या गंभीर परिस्थिती उद्भवली असून केवळ सोशल मीडियावर आलेल्या बंदीच्या निमित्ताने तेथील सरकार कोसळलं आहे. सोशल मीडिया बंदीनंतर नेपाळमध्ये जनक्षोभ उसळला असून आंदोलकांनी संसंदेत आक्रमण करत जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. तर, नेपाळच्या न्यायालय परिसरातही आग लावण्यात आली असून युवकांनी गृहमंत्र्यांच्या घरांवरही हल्ला केला आहे. त्यामुळे, नेपाळमध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असून जिकडे तिकडे नुसता गोंधळ माजल्याचं दिसून येतंय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. अशी परिस्थिती कुठल्याही देशात उद्भवू शकते, सावधान! असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नेपाळमधील आंदोलनाचा परिणाम तेथील राज्यकर्त्यांना भोगावा लागला असून सत्तांतर निश्चित झालं आहे. या आंदोलनानंतर नेपाळमधील मंत्र्यांनी देश सोडायला सुरूवात केली. तर पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, नेपाळमध्ये बालेन शाह यांनी नवीन सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी नेपाळमधील अराजकतेवर ट्विट करुन आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ''Nepal today! ये स्थिती किसी भी देश मे पैदा हो सकती है! सावधान! भारत माता की जय! वंदे मातरम!'', असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये भाजप आणि नरेंद्र मोदी यांना मेन्शन केलं आहे. तसेच, एका युवकाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. आपल्या हक्कांसाठी जागा झालेला युवक असा दिसतो, असे म्हणत संजय राऊतांनी केंद्रातील भाजपला लक्ष्य केलं आहे.

Nepal today!
ये स्थिती किसी भी देश मे पैदा हो सकती है! सावधान!
भारत माता की जय!
वंदे मातरम!@BJP4India @narendramodi https://t.co/sL8pCPCJRo
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 9, 2025

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाली असून आंदोलकांनी एका युवकाचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केलं आहे, ते नाव म्हणजे काठमांडूचे 35 वर्षीय महापौर (Kathmandu Mayor) बालेन शाह (Balendra Shah) होय. बालेन शाह एक रॅपर (Nepal Rapper), महापौर ते आता नेपाळचे नवे नेतृत्व असा त्यांचा काहीसा भन्नाट प्रवास आहे.
Who Is Balendra Shah : कोण आहेत बालेन शाह?
बालेन शाह यांचा जन्म 27 एप्रिल 1990 रोजी काठमांडू येथे झाला. वडील आयुर्वेदिक चिकित्सक तर आई गृहिणी आहेत. त्यांनी BE सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. कर्नाटकातील विश्वेशरैय्या टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून (Visvesvaraya Technological University VTU) त्यांनी स्ट्रक्चरर इंजिनिअरिंग या विषयात M.Tech पदवी घेतली.
रॅपर म्हणून सुरुवात
बालेन शाह यांना सुरुवातीपासूनच संगिताची आवड होती. 2012 मध्ये ‘Sadak Balak’ या गाण्यामुळे बालेन शाह रॅपर म्हणून प्रसिद्ध झाले. 2013 मध्ये Raw Barz Rap Battle मधून ते आणखी लोकप्रिय झाले. रॅपच्या माध्यमातून त्यांनी नेपाळमधील भ्रष्टाचार, सामाजिक प्रश्न आणि राजकीय वास्तव यावर भाष्य केलं.
Balen Shah Political Journey : बालेन शाह यांचा राजकीय प्रवास
सन 2021 मध्ये त्यांनी काठमांडूच्या महापौर पदासाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. 26 मे 2022 रोजी काठमांडू महानगरपालिकेच्या महापौरपदी त्यांनी जोरदार विजय मिळवला. त्यांनी नेपाळी काँग्रेस आणि CPN (UML) यांसारख्या मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना पराभूत केले. 30 मे 2022 रोजी त्यांनी महापौरपदाची शपथ घेतली. काठमांडूचे पहिले स्वतंत्र महापौर म्हणून त्यांचा इतिहासात समावेश झाला. 2023 मध्ये TIME Magazine च्या ‘TIME 100 Next’ यादीत त्यांचा समावेश झाला.