Amul And Mother Dairy : अमूल-मदर डेअरीचं दूध स्वस्त होणार, नवे दर कधीपासून लागू होणार,दरकपातीचं नेमकं कारण काय?

Amul And Mother Dairy : अमूल-मदर डेअरीचं दूध स्वस्त होणार, नवे दर कधीपासून लागू होणार,दरकपातीचं नेमकं कारण काय?
By : | Updated at : 10 Sep 2025 04:27 PM (IST)

: केंद्र सरकारच्या जीएसटी कपातीच्या निर्णयानंतर जीएसटी परिषदेनं पॅकेज्ड दूधावरील 5 टक्के जीएसटीची आकारणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. अमूल आणि मदर डेअरी सारख्या मोठ्या ब्रँडसचं दूध आता स्वस्त होईल. 22 सप्टेंबर पासून पॅकेज्ड दुधावरील जीएसटी 5 टक्क्यांवरुन शुन्यावर येईल.

केंद्र सरकारनं दूध आणि इतर दैनंदिन वस्तूंच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहव्यात यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. महागाई सातत्यानं वाढत असल्याचं चित्र आहे. अशावेळी सरकारनं पॅकेज्ड दुधावरील जीएसटी 5 टक्क्यांवरुन 0 टक्क्यांवर आणला आहे.

सध्या अमलूच्या फूल क्रीम मिल्क (अमुल गोल्ड)ची एका लीटरची विक्री 69 रुपये तर टोंड दुधाची विक्री 57 रुपये लीटर अशी होते. मदर डेअरीच्या फुल क्रीम दुधाची किंमत 69 रुपये तर टोंड मिल्क दुधाची किंमत 57 रुपये आहे. म्हशीच्या दुधाची एका लीटरची किंमत 74-75 रुपये तर गायीच्या दुधाची एका लीटरची किंमत 58-59 रुपये आहे.

पॅकेज्ड दूध विक्रीवरील जीएसटी कमी केल्यानंतर दुधाचे दर 3 ते 4 रुपयांनी कमी होतील. अमूल गोल्ड आणि मदर डेअरीचं फुल क्रीम दूध 65-66 रुपये लीटरनं तर टोंड मिल्क 54-55 रुपये दरानं मिळेल.

अमूल आणि मदर डेअरीचे दूध विक्रीचे नवे दर : Amul and Mother Dairy Milk New Rates

अमूल गोल्ड (फुल क्रीम): एका लीटरची किंमत 69 रुपयांवरुन 65-66 रुपयांवर येईल.

अमूल फ्रेश (टोंड):एका लीटरची किंमत 57 रुपयांवरुन 54-55 रुपयांवर येईल.

अमूल टी स्पेशल:एका लीटरची किंमत 63 रुपयांवरुन 59-60 रुपयांवर येईल.

म्हैशीचं दूध:एका लीटरची किंमत 75 रुपयांवरुन 71-72 रुपये

गायीचं दूध :एका लीटरची किंमत 58 रुपयांवरुन 55-57 रुपये

मदर डेअरी फुल क्रीम:एका लीटरची किंमत 69 रुपयांवरुन 65-66 रुपयांवर येईल.

मदर डेअरी टोन्ड मिल्कः एका लीटरची किंमत 57 किंमत 55-56 रुपयांवर येईल.

मदर डेअरी म्हैशीचं दूध:एका लीटरची किंमत 74 रुपयांवरुन 71 रुपयांवर येईल.

मदर डेअरी गायीचं दूध: एका लीटरची किंमत 59 रुपयांवरुन 56-57 रुपयांवर येईल.


दरम्यान, केंद्र सरकारनं जीएसटीचे स्लॅब 4 वरुन 2 वर आणले आहेत. सध्या 5 आणि 18 टक्के हे दोन स्लॅब असतील. या निर्णयाची अंमलबजावणी 22 सप्टेंबरपासून होणार आहे. त्यानंतर दूध उत्पादनांवरील जीएसटी पूर्णपणे कमी होईल. यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना कमी दरात दूध मिळेल.

📚 Related News