Anil Ambani : अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या, 2929 कोटी बँक फ्रॉड केसमध्ये ईडीकडून नवी गुन्हा दाखल

Anil Ambani : अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या, 2929 कोटी बँक फ्रॉड केसमध्ये ईडीकडून नवी गुन्हा दाखल
By : | Updated at : 10 Sep 2025 06:14 PM (IST)

Bank Loan Fraud Case : रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होत आहे. अनिल अंबानी, रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि इतरांविरोधात 2929 कोटी रुपयांच्या बँक फ्रॉड केसमध्ये ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणात नवा गुन्हा दाखल केला आहे.

अनिल अंबानी अडचणीत (Anil Ambani in Trouble)

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ईडीकडून ही कारवाई गेल्या महिन्यात सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या रिपोर्टवर आधारित आहे. सीबीआयनं स्टेट बँक ऑफ इंडियाला झालेल्या नुकसानासाठी अनिल अंबानी, रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि इतरांना जबाबदार ठरवलं आहे. या प्रकरणी सीबीआयनं अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती.

पहिल्यांदा अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स विरोधात सीबीआयनं 2929 कोटी रुपयांच्या बँक फ्रॉडचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अनिल अंबानी प्रसिद्धीपत्रक जारी करत आरोप फेटाळले होते. कंपनीच्या प्रवक्त्यांनी त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्यचं म्हटलं. याशिवाय त्यांनी आणखी एक दावा केली स्टेट बँकेकडून करण्यात आलेली तक्रार 10 वर्ष जुन्या प्रकरणाशी संबंधित आहे.

कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात दावा करण्यात आला की हे प्रकरण त्यावेळचं आहे जेव्हा अनिल अंबानी आरकॉममध्ये गैर कार्यकारी संचालक होते. कंपनीच्या दररोजच्य कामकाजाशी त्यांचा थेट संबंध नव्हता. दरम्यान सीबीआयच्या कारवाईनंतर मनी लाँड्रिंगच्या संशयावरुन ईडीनं या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक घडामोड म्हणजे ईडीनं अनिल अंबानी यांचे जुने निकटवर्तीय अमिताभ झुनझुनवाला यांची चौकशी केली. यापूर्वीच्या चौकशीत देखील झुनझुनवाला यांचं नाव पुढं आलं होतं.

📚 Related News