Dhanashree Verma Reacts On Yuzvendra Chahal: युझवेंद्र चहलमुळेच धनश्रीला मिळतंय इंडस्ट्रीत काम? अभिनेत्रीनं सोडलं मौन, म्हणाली...

Dhanashree Verma Reacts On Yuzvendra Chahal: युझवेंद्र चहलमुळेच धनश्रीला मिळतंय इंडस्ट्रीत काम? अभिनेत्रीनं सोडलं मौन, म्हणाली...
By : | Updated at : 10 Sep 2025 07:04 AM (IST)

Dhanashree Verma Reacts On Yuzvendra Chahal: टीम इंडियाचा (Team India) धडाकेबाज गोलंदाज युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) घटस्फोटीत (divorced) पत्नी आणि कोरिओग्राफर (Choreographer), अभिनेत्री धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सध्या 'राईज अँड फॉल' (Rise and Fall Show) या रिअॅलिटी शोमध्ये (Reality Show) दिसत आहे. या शोशिवाय तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. अनेकांचं मत आहे की, धनश्रीला मिळणारं यश आणि सातत्यानं नवनव्या शो आणि सिनेमांच्या मिळणाऱ्या ऑफर्सचं कारण युजवेंद्र चहलशी झालेला घटस्फोट आहे. या चर्चांमुळे सध्या धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल पुन्हा एकदा चर्चेत आहेत. अशातच आता या चर्चांवर धनश्री वर्मानं मौन सोडलं आहे.

धनश्री वर्माबद्दल असं म्हटलं जात होतं की, ती युजवेंद्र चहलशी झालेल्या घटस्फोटामुळे मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेत आहे. आता यावर धनश्रीची प्रतिक्रिया समोर आली आहे. धनश्रीनं सांगितलंय की, घटस्फोटामुळे तिला चित्रपटांच्या जास्त ऑफर मिळत नाहीत, पण तिच्याकडे प्रतिभा आहे, म्हणूनच तिला काम मिळतंय.

'...त्याचा काहीही संबंध नाही'

'राईज अँड फॉल'मध्ये धनश्री वर्मा म्हणाली की, "मला विश्वास बसत नाहीये. मी इथे एकटी उभी आहे, संपूर्ण जग माझ्या विरोधात आहे. मला काम मिळतंय, मी आधीही सांगितलेलं की, मला इंडस्ट्री आवडते, कारण लोक अजूनही मला काम देत आहेत. मला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत आहेत, माझ्यासोबत जे घडलं त्यामुळे नाही, तर माझ्यात टॅलेट आहे म्हणून... त्याचा इतर कोणत्याही गोष्टीशी काहीही संबंध नाही..."

धनश्री-चहल या वर्षी घटस्फोट घेऊन वेगळे झाले

धनश्री आणि चहलनं 2020 मध्ये साखरपुडा उरकलेला आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये दोघांनीही गुरुग्राममध्ये लग्न केलं, ज्यामध्ये फक्त त्यांचं कुटुंब आणि काही जवळचे मित्र सहभागी होते. लग्नाच्या पाच वर्षांनंतर, फेब्रुवारी 2025 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांच्या घटस्फोटाची चर्चा बरीच रंगली. चहलच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर धनश्रीला खूप ट्रोल केलं. घटस्फोटावेळी चहलनं घातलेल्या टीशर्टचीही खूप चर्चा रंगली.

दरम्यान, 'भूल चुक माफ' चित्रपटातील 'टिंग लिंग सजना' या गाण्यानं धनश्री वर्मानं मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातलाय. यामध्ये ती अभिनेता राजकुमार रावसोबत दिसलेली. याशिवाय ती 'देखा जी देखा मैं' या व्हिडीओ अल्बमध्येही दिसलेली. लवकरच धनश्री वर्मा प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिल राजू यांच्या 'आकाशम दाती वास्तव' या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमातून ती तेलुगू चित्रपटातून पदार्पण करेल. चित्रपटाची कथा डान्सवर आधारित आहे. सध्या ती 'राईज अँड फॉल' या रिअॅलिटी शोमध्ये दिसतेय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

📚 Related News