Navratri 2025: गणेशोत्सवानंतर आता भाविकांना वेध लागलेत ते म्हणजे देवीच्या आगमनाचे. पितृपक्ष संपताच नवरात्रौत्सवाची सुरूवात होणार आहे. यासाठी विविध ठिकाणी तयारीला सुरूवातही झाली आहे, जसं की आपल्याला माहित आहे, नवरात्रीमध्ये 9 दिवस वेगवेगळ्या रंगांचे कपडे घातले जातात, असे मानले जाते की यामुळे देवी दुर्गेच्या 9 रूपांचे आशीर्वाद मिळतात. 2025 मध्ये नवरात्रीचे 9 रंग कोणते आहेत? जाणून घ्या.
नवरात्रीच्या उत्सवात रंगांचे विशेष महत्त्व..
वैदिक पंचांगानुसार, यंदा 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्री सुरू होत आहे. ती आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होणारी नवरात्र ही नवमी तिथीपर्यंत असते. नवरात्रीच्या उत्सवात रंगांचे विशेष महत्त्व आहे. या सणाच्या प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे रंग आहेत. असे म्हटले जाते की, 9 दिवस देवी दुर्गेच्या रूपानुसार त्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्याने 9 देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो. नवरात्रीच्या नऊ तिथी आणि दिवसांनुसार प्रत्येक वेळी रंग बदलतात. यंदा 2025 वर्षात नवरात्रीचे 9 रंग येथे जाणून घ्या.
2025 मध्ये नवरात्रीच्या 9 दिवसांचे रंग कोणते आहेत?
22 सप्टेंबर 2025 (देवी शैलपुत्री, प्रतिपदा) - पांढरा
23 सप्टेंबर 2025 (देवी ब्रह्मचारिणी, द्वितीया) - लाल
24 सप्टेंबर 2025 (देवी चंद्रघंटा, तृतीया) - गडद निळा
25 सप्टेंबर 2025 (देवी कुष्मांडा, चतुर्थी) - पिवळा
26 सप्टेंबर 2025 - (देवी स्कंदमाता, पंचमी) हिरवा
27 सप्टेंबर 2025 - ( पंचमी) - राखाडी
28 सप्टेंबर 2025 - (देवी कात्यायनी, षष्ठी) केशरी
29 सप्टेंबर 2025 - (देवी कालरात्री, सप्तमी) मोरपंखी
30 सप्टेंबर 2025 - (देवी महागौरी, अष्टमी) गुलाबी
1 ऑक्टोबर 2025 (देवी सिद्धिदात्री, नवमी) - जांभळा
नवरात्रीच्या 9 रंगांचे महत्त्व
पांढरा रंग
पांढरा रंग हा शांती, पवित्रतेचे प्रतीक आहे. नवरात्रीत या रंगाचे कपडे घालून पूजा केल्याने धार्मिक कार्यात एकाग्रता वाढते असे मानले जाते.
लाल रंग
लाल रंग हा क्रियाकलाप आणि उत्साहाचे प्रतीक आहे, तो माता राणीला सर्वात जास्त प्रिय आहे, जो व्यक्तीमध्ये ऊर्जा जागृत करतो.
निळा रंग
निळा रंग हा आकाशाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा करणाऱ्यांना आनंद आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात.
पिवळा रंग
पिवळा रंग हा स्नेहाचे प्रतीक आहे. नवरात्रीत या रंगाचे कपडे घालणे खूप शुभ असते. आईच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो.
हिरवा रंग
हिरवा रंग हा प्रत्येक क्षेत्रात यशासाठी आवश्यक असलेल्या वाढीचे आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक आहे. हा रंग जीवनात नवीन आनंद आणतो.
राखाडी रंग
राखाडी रंग संतुलन दर्शवितो. नवरात्रीत या रंगाचे कपडे घालून पूजा केल्याने इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती मिळते.
केशरी रंग
केशरी कपडे घालून देवीची पूजा करणाऱ्यांमध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो असे मानले जाते.
मोरपंखी रंग
मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो.
गुलाबी रंग
गुलाबी रंग प्रेम, स्नेह आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. आनंदी वैवाहिक जीवनासाठी आणि चांगला वर मिळविण्यासाठी नवरात्रीत या रंगाचे कपडे घालणे शुभ असते.