Walmik Karad & Ujjwal Nikam: संतोष देशमुख खटल्यातील आरोपींकडून D2 ऑपरेशन सुरू, उज्वल निकमांचा कडाडून विरोध, कोर्टात नेमकं काय घडलं ?

Walmik Karad & Ujjwal Nikam: संतोष देशमुख खटल्यातील आरोपींकडून D2 ऑपरेशन सुरू, उज्वल निकमांचा कडाडून विरोध, कोर्टात नेमकं काय घडलं ?
By : | Edited By: Mukta Sardeshmukh | Updated at : 10 Sep 2025 02:11 PM (IST)

Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींकडून खटला लांबवण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालू असल्याचं सांगत सरकारी वकील उज्वल निकम यांनी वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जांवर कडाडून विरोध केला . खटल्यातील आरोपींकडून D2 ऑपरेशन सुरु असल्याचा आरोप त्यांनी केलाय . सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती होती. आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींच्या दोष मुक्तीअर्जावर युक्तिवाद झाला. याच दोष मुक्तीच्या अर्जाला उज्वल निकम यांनी कडाडून विरोध केला. कोर्टाने सुनावणीची पुढील तारीख दिली असून या खटल्याची पुढील सुनावणी आता 24 सप्टेंबर रोजी होणार आहे .

आरोपींकडून D2 ऑपरेशन: उज्वल निकम

या प्रकरणातील आरोपींकडून D2 ऑपरेशन राबविले जात आहे. 'डी फॉर - डिले द ट्रायल अँड डी फॉर - डिरेल द ट्रायल 'असं उज्वल निकम यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान म्हटल आहे. सरकारी पक्षाने न्यायालयात गंभीर स्वरूपाची तक्रार केली. आरोपींकडून वेळोवेळी वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळे अर्ज केले जातायत. या खटल्याची सुनावणी लांबविण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याने याकडे न्यायालयाचे लक्ष वेधल्याचं निकम यांनी म्हटलं..

आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींकडून दोष मुक्तीचा अर्ज करण्यात आला. याच दोष मुक्तीच्या अर्जा संदर्भात त्यांच्या वकिलाने युक्तिवाद केला. सीआयडीने एकत्रित आरोप पत्र दाखल केले. हे चुकीच आहे. हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना नाही.. हा अधिकार केवळ न्यायालयाचा आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाचा येथील अंजनाबाई गावित खटल्याचा निकाल आधार म्हणून देण्यात आला.

दरम्यान जिल्हा न्यायालयाने वाल्मिक कराडचा दोष मुक्ती आणि जामीन अर्ज फेटाळल्याने कराडने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर 19 तारखेला उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे याची सुनावणी होणार आहे.

प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबर रोजी

जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचा तुरुंगातील मुक्काम वाढल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी आज (10 सप्टेंबर ) रोजी होणार असल्या तर सांगण्यात आलं .गेल्या सुनावणीत काही आरोपींच्या आरजांवर निर्णय राखून ठेवण्यात आला होता .काही अर्जाच्या बाबत मूळ फिर्यादींचे म्हणणे न्यायालयासमोर न आल्याने सुनावणी पुढे ढकळण्यात आली होती .आज झालेल्या सुनावणीत सरकारी वकील उज्वल निकम यांनी वारंवार दाखल होणाऱ्या अर्जांवर आक्रमक भूमिका घेतली असून हे दाखल होणारे अर्ज खटल्याची सुनावणी लांबवण्याचे पद्धतशीर प्रयत्न असल्याचा जोरदार युक्तिवाद त्यांनी केला . तर सीआयडीने दाखल केलेलं एकत्रित आरोप पत्र चुकीचं असल्याचा युक्तिवाद आरोपी वाल्मीक कराडचा वकिलांनी न्यायालयासमोर केला . दरम्यान कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबर रोजी होईल असे सांगितले आहे .

📚 Related News