VIDEO : नेपाळच्या अर्थमंत्र्यांच्या छातीवर लाथ घातली; बेदम मारहाण; झुंड आलेली पाहून पळ काढण्याची वेळ

VIDEO : नेपाळच्या अर्थमंत्र्यांच्या छातीवर लाथ घातली; बेदम मारहाण; झुंड आलेली पाहून पळ काढण्याची वेळ
By : | Updated at : 09 Sep 2025 07:10 PM (IST)

Nepal Finance Minister Kicked : सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर Gen z मुलांनी सुरु आंदोलन केलं आणि नेपाळमधील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. आंदोलनकर्त्यांनी नेपाळच्या अर्थमंत्र्‍यांना रस्त्यावर बेदम मारहाण केली आहे. झुंड मारण्यासाठी अंगावर आल्यानंतर नेपाळच्या अर्थमंत्र्यांना अक्षरश: पळ काढावा लागलाय. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान पदावरून के.पी. शर्मा ओली यांनीही राजीनामा दिला आहे. राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचारासह विविध मुद्द्यांवरून हिंसक आंदोलन सुरू आहे.

अनेक मंत्र्यांच्या घरावर हल्ले, घरं जाळण्यास सुरुवात

मीडिया रिपोर्टनुसार, नेपाळचे अर्थमंत्री विष्णु प्रसाद पोडैल यांना मारण्यासाठी आलेल्या झुंडीने त्यांना रस्त्यावर पिटाळून मारले. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, पोडैल यांना जमावाने घेरले आहे, मात्र ते कसंबसं सुटून धावताना दिसत आहेत. तेवढ्यात रस्त्यावर असलेल्या एका आंदोलकाने त्यांना लाथ मारली आणि ते खाली कोसळले. त्यानंतर जमाव पुन्हा त्यांच्यावर तुटून पडतो आणि पोडैल कसाबसा जीव वाचवून पळ काढतात. दरम्यान, एबीपी माझा या व्हिडीओची पुष्टी करत नाही.

मोठ्या नेत्यांची घरे जाळली

आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्यासह अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या खाजगी निवासस्थानांवर हल्ला केला तसेच संसद भवनात तोडफोड केली. ओली यांच्या राजीनाम्याच्या काही तास आधी आंदोलनकर्त्यांनी बालकोट येथील त्यांच्या खासगी निवासस्थानाला आग लावली. तसेच माजी पंतप्रधान पुष्प कमल दाहाल, माहिती व प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग, माजी गृह मंत्री रमेश लेखक आदींच्या घरांवर हल्ले झाले.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांनी काठमांडूच्या नायकाप येथे असलेल्या माजी गृह मंत्री रमेश लेखक यांच्या निवासस्थानालाही आग लावली. ही घटना त्यांच्या राजीनाम्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, आंदोलन करणाऱ्या तरुणांनी ललितपूर जिल्ह्यातील सुनाकोठी येथे असलेल्या माहिती व प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या घरावर दगडफेक केली. गुरुंग यांनी सोशल मीडिया संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

📚 Related News