Shadashtak Yog 2025: शनि-मंगळाचं मोठं षडयंत्र, मात्र 'या' 3 राशींच्या सौभाग्याला धक्काही लागणार नाही, 20 सप्टेंबरपासून राजासारखं जीवन जगणार..

Shadashtak Yog 2025: शनि-मंगळाचं मोठं षडयंत्र, मात्र 'या' 3 राशींच्या सौभाग्याला धक्काही लागणार नाही, 20 सप्टेंबरपासून राजासारखं जीवन जगणार..
By : | Updated at : 11 Sep 2025 07:17 AM (IST)

Shadashtak Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, शनि आणि मंगळाचं नाव काढताच भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण न्यायाचा देव मानला जाणारा शनि हा सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक आहे. तर अग्नि तत्व असलेला मंगळ देखील एक अतिशय शक्तिशाली ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात, शनि आणि मंगळ हे खूप शक्तिशाली आणि भयंकर ग्रह मानले जातात. लवकरच ते एक धोकादायक षडाष्टक योग बनवत आहेत. ज्योतिषशास्त्रात हे योग खूप अशुभ मानले जाऊ शकते परंतु ते 3 राशींसाठी शुभ ठरू शकते.

अशुभ षडाष्टक योग 'या' 3 राशींसाठी भाग्यशाली ठरणार!

ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या शनि मीन राशीत वक्री अवस्थेत आहे आणि नोव्हेंबरपर्यंत वक्री राहील. दरम्यान, मंगळ अशा स्थितीत आहे की शनि-मंगळ एकत्रितपणे एक भयंकर योग बनवतील. 13 सप्टेंबर रोजी मंगळ तूळ राशीत संक्रमण करेल आणि प्रवेश करेल. त्यानंतर बरोबर 1 आठवड्यानंतर, शनि आणि मंगळ एकमेकांपासून 150 अंशांवर असतील, ज्यामुळे षडाष्टक योग तयार होईल. ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. जरी षडाष्टक योग अशुभ मानला जात असला तरी 20 सप्टेंबर रोजी होणारा हा योग 3 राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे.

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी शनि-मंगळाचा षडाष्टक योग अनेक क्षेत्रात फायदेशीर ठरू शकतो. संपत्ती वाढेल. नशीब तुमच्या सोबत असेल. करिअरमध्ये प्रगती होईल. वैवाहिक जीवनात आनंद येईल. जुन्या समस्या सुटतील.

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी शनि-मंगळाचा षडाष्टक योग शुभ राहील. व्यवसायात नवीन उंची गाठाल. मोठा नफा होईल, नवीन ऑर्डर मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत असेल. खर्च कमी होईल आणि तुम्ही बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही नवीन काम सुरू करू शकता.

मीन

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी शनि-मंगळाचा षडाष्टक योग चांगला राहील. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील. व्यवसाय वाढेल. व्यवसायातील समस्या आता सुटतील. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचाही फायदा होऊ शकतो. नातेसंबंध सुधारतील.

📚 Related News