Shani Dev 2025 :वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनि हा दु:ख,रोग, अडचणी, लोखंड, खनिज तेल, कर्मचारी, सेवक यांचा कारक ग्रह मानला जातो. त्याचबरोबर, शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो हे आपल्याला माहीतच आहे. शनिने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश केल्यास तब्बल अडीच वर्ष तो त्याच राशीत स्थित असतो. त्यानुसार, नवीन वर्ष 2026 मध्ये शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे काही राशींचे सोन्याचे दिवस लवकरच सुरु होतील.
या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. वृषभ रास (Taurus Horoscope) वृषभ राशीसाठी 2026 चं नवं वर्ष फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या उत्पन्नाच्या स्थानी शनी देव संक्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली भरभराट दिसून येईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल.
तसेच, घर-कुटुंबात आनंदी वातावर पाहायला मिळेल. या काळात एखादं मोठं प्रोजेक्टही तुमच्या हाती लागू शकतं. तुमच्या प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ तुमच्याबरोबर असणार आहे. त्यामुळे हा काळ आनंदात जाईल. तूळ रास (Libra Horoscope) तूळ राशीसाठी 2026 हे नवं वर्ष फार अनुकूल ठरणार आहे.
या राशीच्या सहाव्या स्थानी शनिदेव विराजमान असतील. त्यामुळे तुमची अनेक दिवसांपासून सुरु असलेली कोर्ट कचेरीच्या संदर्भातील कामे लवकरच संपतील. एखाद्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही पैशांची गुंतवणूक करु शकता. तसेच, मित्रपरिवार आणि वरिष्ठांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. या काळात नशिबाची साथ तुमच्या बरोबर असणार आहे.
त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कुंभ रास (Aquarius Horoscope) कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात फार भाग्यशाली ठरणार आहे. या काळात शनि तुमच्या धन स्थानी विराजमान असतील. त्यामुळे या दरम्यान वेळोवेळी तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तुमची रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता.
तसेच, चांगडी डीलदेखील तुमच्या हाती लागू शकते. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात स्थिरता येईल. मित्र-मैत्रीणींबरोबर सामंजस्याने व्यवहार कराल. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
).








