iphone 17 Launch Event: जगभरातील टेकप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत असलेला ॲपलचा वार्षिक शो म्हणजे “Awe Dropping” इव्हेंट उद्या (9 सप्टेंबर) रात्री भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात ॲपल आपली नवी iPhone 17 सीरिज सादर करणार आहे. यावेळी स्मार्टफोनमध्ये एआय फीचर्स, अधिक ऍडव्हान्स कॅमेरा सिस्टीम आणि अधिक स्लिम डिझाइन असे बदल अपेक्षित आहेत. मात्र भारतीय ग्राहकांच्या नजर मुख्यत्वे किंमतीवर खिळली आहे. या सोबतच नवे Apple Watch, AirPods Pro 3 आणि काही हार्डवेअर अपडेट्सचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.
किंमतीत वाढ होणार का?
तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन संस्था Techarc च्या अहवालानुसार, भारतात iPhone 17 च्या बेस मॉडेलची किंमत साधारण ₹86,000 पर्यंत जाऊ शकते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या iPhone 16 च्या बेस मॉडेलपेक्षा जवळपास ₹6,000 ने जास्त. iPhone 16 ची किंमत ₹79,900 ठेवण्यात आली होती.
तज्ज्ञांच्या मते, iPhone च्या किंमती आणि USD-INR विनिमय दर यांचा थेट संबंध आहे. मागील काही वर्षांत आयफोनच्या किंमती दरवर्षी सरासरी 7.6% ने वाढल्या, तर रुपया डॉलरच्या तुलनेत जवळपास 5.2% ने घसरला. वास्तविक महागाईचा विचार केला तर किंमतवाढ दरवर्षी केवळ 2.4% इतकी आहे.
iPhone किंमतींचा प्रवास
-
2008 : iPhone 3G – ₹31,000
-
2010 : iPhone 4 – ₹34,500
-
2012 : iPhone 5 – ₹45,500
-
2014 : iPhone 6 – ₹53,500
-
2016 : iPhone 7 – ₹60,000
-
2017 : iPhone 8 – ₹64,000
-
2017 : iPhone X – ₹89,000
-
2020 ते 2024 : iPhone 12 ते iPhone 16 – ₹79,900
-
2025 अंदाज : iPhone 17 – ₹86,000
भारतात उत्पादन, तरीही किंमत वाढ
ॲपल आता भारतातच iPhone 17 चे असेंब्ली उत्पादन करणार आहे. मात्र प्रोसेसर, कॅमेरे आणि डिस्प्ले यांसारखे महत्वाचे पार्ट्स आयात करावे लागतात. त्यामुळे परकीय चलनातील बदलांचा परिणाम अंतिम किंमतीवर होणारच. स्थानिक उत्पादनामुळे सप्लाय चेन मजबूत होईल, पण ग्राहकांना किंमतीत फारसा दिलासा मिळेल असं दिसत नाही.
Techarc च्या अंदाजानुसार, 2025 मध्ये भारतात ॲपलचे शिपमेंट 1.5 crore units पर्यंत जाऊ शकते. यामुळे भारतीय स्मार्टफोन बाजारात ॲपलचा हिस्सा 12-15% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दशकभरापूर्वी हा हिस्सा फक्त 1-1.5% इतकाच होता.
ग्राहकांची उत्सुकता शिगेला
आता भारतीय ग्राहकांच्या नजरा पूर्णपणे ॲपलकडे लागल्या आहेत. iPhone 17 मध्ये slim design, सुधारित AI फीचर्स, दमदार कॅमेरे आणि बॅटरी परफॉर्मन्समध्ये कोणते बदल दिसणार, हे पाहण्यासाठी तंत्रज्ञानप्रेमी उत्सुक आहेत. उद्याच्या इव्हेंटमध्ये ॲपल खरोखरच iPhone 17 बेस मॉडेलसाठी ₹86,000 ची किंमत जाहीर करते का, की भारतीय बाजारासाठी खास रणनीती आणते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.