Asia Cup 2025 : आशिया कपचे सामने मोबाईलवर कुठं पाहायला मिळणार, Live Streaming चा पत्ता बदलला, संपूर्ण मालिका इथं पाहता येणार

Asia Cup 2025 : आशिया कपचे सामने मोबाईलवर कुठं पाहायला मिळणार, Live Streaming चा पत्ता बदलला, संपूर्ण मालिका इथं पाहता येणार
By : | Updated at : 09 Sep 2025 06:14 PM (IST)

दुबई : आजपासून आशिया कप 2025 ला सुरुवात होत आहे. पहिली मॅच अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग (Afghanistan vs Hong Kong) यांच्यात होणार आहे. भारताची पहिली मॅच संयुक्त अरब अमिरात विरुद्ध 10 सप्टेंबरला होणार आहे. भारतानं 2023 मध्ये झालेल्या आशिया कपचं विजेतेपद मिळवलं होतं. यंदाच्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान 14 सप्टेंबरला आमने सामने येतील. तर, भारत आणि ओमान यांच्यातील मॅच 19 सप्टेंबरला होणार आहे. ओमानचा संघ पहिल्यांदा आशिया कपमध्ये खेळत आहेत. आशिया कपला आजपासून सुरुवात होत आहे. आशिया कपचे सामने फोनवर कुठं पाहायचे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आशिया कपचे फोनवरील लाईव्ह स्ट्रीमिंग (Asia Cup 2025 Live Streaming) Sony Liv या अॅपवरुन केलं जाईल.

Asia Cup Live Streaming : आशिया कप मॅचेस मोबाईलवर कुठं पाहणार?

आशिया कप 2025 च्या मॅचेसचं लाईव्ह स्ट्रीमिंग Sony Liv अॅपवर होणार आहे. एंड्रॉइड फोन यूजर्स फोनमध्ये Sony Liv डाऊनलोड करुन ते सबस्क्राईब करुन मॅचेस पाहू शकतात.

आशिया कपच्या मॅचेस फोनवर मोफत पाहता येणार? Is Asia Cup Live Streaming Free

मोबाईल यूजर्स अशिया कपच्या मॅचेस फ्रीमध्ये पाहू शकत नाहीत. Sony Liv चा सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करावा लागेल. एका वर्षाचा मोबाईल प्लॅन 399 रुपये आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध हाँग काँग मॅच कधी सुरु होणार?

आशिया कपची पहिली मॅच अफगाणिस्तान आणि हाँग काँग यांच्यात अबुधाबी येथ होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार ही मॅच 8 वाजता सुरु होईल. 15 सप्टेंबरला होणारी ओमान विरुद्ध यूएई यांच्यातील मॅच वगळता इतर मॅचेस भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होतील. तर, ओमान विरुद्ध यूएई मॅच सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. सोनी स्पोर्टस नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर मॅचेस पाहता येतील.

आशिया कपसाठी भारताचा संघ (Asia Cup India Squad)

सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुभमन गिल (उपकॅप्टन ), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग

आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)

9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम सामना

20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना

📚 Related News