Astrology : आज सर्वार्थ सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; मिथुनसह 'या' 5 राशींना मालामाल होण्याचे संकेत, देवी लक्ष्मीची कृपा

Astrology : आज सर्वार्थ सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; मिथुनसह 'या' 5 राशींना मालामाल होण्याचे संकेत, देवी लक्ष्मीची कृपा
By : | Updated at : 11 Sep 2025 08:13 AM (IST)

Astrology Panchang Yog 11 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 11 सप्टेंबर 2025 चा दिवस आहे. आजचा दिवस दत्तगुरुंना समर्पित आहे. तसेच, आज चंद्राने मेष राशीत प्रवेश केला आहे. चंद्राच्या या संक्रमणाने वसुमान योग नावाचा शुभ योग जुळून आला आहे.तसेच, आदित्य योगासह अनेक शुभ योगदेखील जुळून आले आहेत. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती दिसून येईल. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. जर तुम्हाला नोकरीत बदल करायचा असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला कुटुंबियांचा देखील चांगला सपोर्ट मिळेल.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. नशिबाची तुम्हाला साथ मिळून तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. भौतिक सुख सुविधांचा तुम्ही चांगला लाभ घ्याल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तसेच, तुमच्या आर्थिक संपत्तीत भरभराट झालेली दिसेल. दत्तगुरुंच्या कृपेने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. समाजातील काही मोठ्या लोकांशी तुमचा संवाद होईल. पैशांची गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसांठी आजचा दिवस सुख समृद्धीचा असणार आहे. तुमच्या हाती मोठी संधी चालून येईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. समाजातील काही प्रतिष्ठीत लोकांशी तुमच्या गाठीभेटी होतील. तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. समाजात तुमचा मान-सन्मान टिकून राहील. तसेच, नवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल. तुमच्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. मित्र मैत्रीणींच्या पाठिंब्याने तुमची चांगली प्रगती होईल.

📚 Related News