Nepal Protest: सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरली. यानंतर झालेल्या अभूतपूर्व उद्रेकात नेपाळमधील राजकीय सम्राटांचे धाबे दणाणले आहेत. घरेच्या घरे पेटवून देतानाच नेपाळच्या तरुणाईनं संसद आणि राष्ट्रपती भवन सुद्धा पेटवून दिलं. देश पेटल्यानंतर नेपाळ पंतप्रधान लष्कराच्या सुरक्षेत पळाले असून ते कोठे आहेत याची माहिती नाही. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात नेपाळमधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. निदर्शकांनी संसद, पंतप्रधान, राष्ट्रपतींचे वैयक्तिक निवासस्थान आग लावतानाच सुरक्षा दलांकडून शस्त्रे हिसकावून घेतली. त्यांनी 3 माजी पंतप्रधानांच्या घरावरही हल्ला केला.
अर्थमंत्र्यांना रस्त्यावर पळवून ठार मारलं
. त्यांना तातडीने कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांना त्यांच्या घरात मारहाण करण्यात आली, तर अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना काठमांडूमधील त्यांच्या घराजवळ पाठलाग करून ठार मारण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक निदर्शक त्यांच्या छातीवर लाथ मारताना दिसत आहे. देशात सुरू असलेल्या हिंसक घटनांमध्ये पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला. लष्कराच्या हेलिकॉप्टरने त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. राजधानी काठमांडू आणि आसपासच्या भागात झालेल्या संघर्ष आणि जाळपोळीत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
आतापर्यंत काय घडलं? 10 मोठे मुद्दे
1. माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नीला जाळण्यात आले
निदर्शकांनी नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या घराला आग लावली. यामध्ये त्यांच्या पत्नी गंभीर भाजल्या. नंतर त्यांचा मृत्यू झाला.
2. माजी पंतप्रधान देउबा आणि त्यांच्या पत्नीला घरात मारहाण करण्यात आली
मंगळवारी निदर्शकांनी माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि त्यांच्या पत्नी, परराष्ट्र मंत्री आरजू राणा यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली.
3. अर्थमंत्र्यांचा पाठलाग करून मारहाण करण्यात आली
मंगळवारी निदर्शकांनी अर्थमंत्री विष्णू पौडेल यांचा पाठलाग करून मारहाण केली. त्यांनी त्यांच्या छातीवर लाथा मारल्या. (व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.)
4. संसद भवन जाळण्यात आले
मंगळवारी निदर्शकांनी नेपाळच्या संसदेला आग लावली.
5. पंतप्रधान ओली यांचे खासगी निवासस्थान जाळण्यात आले
मंगळवारी पंतप्रधान ओली यांचे घर जाळण्यात आले. त्यानंतर धुराचे लोट उठताना दिसले.
6. राष्ट्रपती भवन सुद्धा जाळण्यात आले.
मंगळवारी निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या निवासस्थानाला (शीतल भवन) आग लावली.
7. गृहमंत्र्यांच्या वैयक्तिक निवासस्थानी हल्ला
मंगळवारी निदर्शकांनी राजीनामा दिलेले गृहमंत्री रमेश लेखक यांच्या घराला आग लावली आणि तोडफोड केली.
8. नेपाळी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जाळपोळ
मंगळवारी निदर्शकांनी नेपाळी काँग्रेस कार्यालयाला आग लावली.
9. संसद भवनावर कब्जा
पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर निदर्शकांनी संसद भवनावर कब्जा केला.
10. संसद भवनात लूटमार
निदर्शकांनी संसद भवनावर कब्जा केल्यानंतर गोंधळ घातला. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांची शस्त्रेही लुटली.
11. सिंह दरबारात जाळपोळ
नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांचा फोटो सिंह दरबारात आगीत टाकण्यात आला. सिंह दरबारात नेपाळच्या मंत्र्यांची कार्यालये आहेत.
12. लष्कराने पंतप्रधान ओलींना सुरक्षित ठिकाणी नेले
सुरक्षा दलांनी पंतप्रधान ओली यांना हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यांना कुठे नेण्यात आले आहे हे माहित नाही.
इतर महत्वाच्या बातम्या