Baramati Crime News: माझ्या जागेत बाथरूम का बांधलं? जाब विचारताच काका अन् भावाने केली जबर मारहाण, 24 वर्षीय तरूणाचा मृत्यू, बारामतीतील घटना

Baramati Crime News: माझ्या जागेत बाथरूम का बांधलं? जाब विचारताच काका अन् भावाने केली जबर मारहाण, 24 वर्षीय तरूणाचा मृत्यू, बारामतीतील घटना
By : | Edited By: Ankita Khane | Updated at : 11 Sep 2025 10:09 AM (IST)

बारामती: आपल्या जागेत बाथरूम का बांधले म्हणून विचारणा करावयास गेलेल्या पुतण्याला बाप लेकाने बेदम मारहाण केली. यात पुतण्याचा जीव गेला. या प्रकरणी तालुका पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथील इंगळे वस्तीवर काल (बुधवारी) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमध्ये सौरभ विष्णू इंगळे या 24 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात तालुका पोलिसांनी प्रमोद रामचंद्र इंगळे व रामचंद्र जगन्नाथ इंगळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विशेष म्हणजे सौरभला मारहाण केल्यानंतर प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे हे दोघेजण तालुका पोलीस ठाण्यात येऊन सौरभ विरोधात फिर्याद देऊन गेले होते, मात्र या दरम्यान सौरभला बारामतीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाथरूम माझ्या जागेत बांधले असा सौरभचा दावा होता. यावरून इंगळे वस्तीवर सौरभ इंगळे याने प्रमोद आणि रामचंद्र इंगळे यांना जाब विचारला. याचे भांडणात रुपांतर झाले. या भांडणात प्रमोद आणि रामचंद्र इंगळे या दोघांनी सौरभला बेदम मारहाण केल्याने सौरभच्या चुलत भावांनी सौरभला बारामती दवाखान्यात आणले. या दरम्यान आपल्याला मारहाण होत असल्याची माहिती देखील सौरभने पोलिसांना दिली होती. बारामतीतील दवाखान्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. तोपर्यंत प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे हे दोघेजण बारामती तालुका पोलीस ठाण्यात आले होते आणि त्यांनी सौरभ विरोधात फिर्याद दिली आहे.

नेमकं काय घडलं?

आपल्या जागेत बाथरूम का बांधले म्हणून विचारणा करावयास गेलेल्या पुतण्याला बाप लेकाने बेदम मारहाण केली. सौरभला मारहाण केल्यानंतर प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे हे दोघेजण तालुका पोलीस ठाण्यात येऊन सौरभ विरोधात फिर्याद देऊन गेले होते, मात्र या दरम्यान सौरभला बारामतीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाथरूम माझ्या जागेत बांधले असा सौरभचा दावा होता. यावरून इंगळे वस्तीवर सौरभ इंगळे याने प्रमोद आणि रामचंद्र इंगळे यांना जाब विचारला. याचे भांडणात रुपांतर झाले. या भांडणात प्रमोद आणि रामचंद्र इंगळे या दोघांनी सौरभला बेदम मारहाण केल्याने सौरभच्या चुलत भावांनी सौरभला बारामती दवाखान्यात आणले. बारामतीतील दवाखान्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती आणखी बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

📚 Related News