Bhojpuri Singer Devi Blessed With Baby Boy: प्रसिद्ध गायिकेनं चाहत्यांना गूड न्यूज (Good News) दिली असून तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. पण, गायिका लग्न न करताच आई झाली आहे. गायिकेनं अद्याप कुणासोबतही लग्न केलेलं नाही. त्यामुळे गायिकेनं सोशल मीडियावर बाळाला जन्म दिल्याचं सांगताच चर्चांना उधाण आलं आहे. अनेकजण कमेंट करत प्रश्न उपस्थित करत आहेत. तसेच, अनेकांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.
प्रसिद्ध भोजपुरी गायिका देवी (Bhojpuri Singer Devi) अविवाहित आहे, पण तिनं नुकतीच एका मुलाला जन्म दिला आहे. तिची प्रसूती ऋषिकेश एम्समध्ये झाली आणि त्यानंतर गायिकेनं तिचा मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मीडिया रिपोर्टनुसार, गायिका देवी हिनं गर्भधारणेसाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब केला आणि गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या शुक्राणूंसाठी जर्मनीतील एका शुक्राणू बँकेची मदत घेतली. ही ट्रिटमेंट घेतल्यानंतर गायिका लग्न न करताच गरोदर राहिली.
गायिका बनली 'सिंगल मदर'
भोजपुरी गायिका देवी हिनं तिच्या फेसबुक पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिनं ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे मुलाला जन्म दिला आणि आता तिला सिंगल मदर होण्याचा बहुमान मिळाल्याचं सांगितलं. गायिकेला बाळ झाल्यानंतर तिचं संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. गायिका देवी म्हणाली की, तिला आता 'जगातील सर्व आनंद' मिळाला आहे. दरम्यान, आई आणि मूल दोघेही पूर्णपणे निरोगी आहेत.
IVF आणि जर्मन स्पर्म बँकेची मदत
देवीनं जर्मन स्पर्म बँकेच्या मदतीनं आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) तंत्रज्ञानाद्वारे मातृत्वाचं स्वप्न पूर्ण केलं. तिनं याआधीही ही प्रक्रिया वापरून पाहिली होती, पण ती अयशस्वी झाली. यावेळी सर्व काही तिच्या मनासारखं झालं आणि तिला अभिमान वाटला की, ती पती आणि लग्नाशिवाय आई झाली आहे, अगदी तिच्या इच्छेनुसार, असं तिनं सांगितलं.
दरम्यान, भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका देवीला लोकगीतांमुळे प्रसिद्धी मिळाली. तिनं 50 पेक्षा जास्त अल्बम सॉन्ग गायले आहेत. 'पिया गईले कलकतवा ए सजनी' हे गाणं लोकप्रिय झालं होतं. 'दिल तुझे पुकारे आजा', 'अईले मोरे राजा', 'ओ गोरी चोरी-चोरी' आणि 'परदेसिया-परदेसिया' या गाण्यांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.