Internal displeasure within Shiv Sena Shinde faction: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू आहे. राजकीय भेटींचा सिलसिला सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे मुंबई महापालिकेसाठी एकत्र येण्याची चर्चा रंगली असतानाच तिकडे शिवसेना शिंदे गटामध्येही पदाधिकारी निवडी सुरू आहेत. मात्र, या पदाधिकारी निवडीवरून शिवसेना शिंदे गटामध्ये नाराजीचा स्फोट झाला आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटामध्ये विभागप्रमुखाची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक इच्छुकांना डावलण्यात आल्याने यांच्याकडे भेटून त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली.
काहींनी आपली नाराजी सोशल मीडियामधून सुद्धा व्यक्त केली
काही जणांनी आपल्यानंतर पक्षांमध्ये जे आले आहेत त्यांना संधी दिल्याचा आरोप सुद्धा केला आहे. त्यामुळे . शिवसेना शिंदे गटाकडून मध्ये सुद्धा आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर पदाधिकारी निवडी करण्यात येत आहेत. काहींनी आपली नाराजी सोशल मीडियामधून सुद्धा व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे, तर नाराजांना शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा गळ टाकण्यात येत आहे. त्यामुळे अपेक्षित संधी न मिळाल्याने त्यांना परत शिवसेना ठाकरे गटामध्ये येण्याचे सुद्धा सल्ला दिला जात आहे. पश्चिम उपनगरांमध्ये देखील पदाधिकारी निवडीवरून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक पदाधिकारी राजीनामाचे पावित्र्यात आहेत.
ठाकरे बंधूंच्या भेटीचा सिलसिला
दुसरीकडे, हिंदी सक्तीचा वरवंटा उखडून फेकल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले होते. तेव्हापासून या दोन्ही बंधूंमध्ये भेटीगाठीचा सिलसिला सुरू आहे. काल (10 सप्टेंबर) उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. ही आतापर्यंतची दोन्ही बंधूंमधील चौथी भेट आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी दोन्ही बंधू एकत्र येतील अशी शक्यता आणखी वाढली आहे. या बैठकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीनंतर आज राज ठाकरे यांची आपल्याला नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंकडून जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या