Superstar Gave 3 Billion Alimony To Wife After Divorced: सध्या करिष्मा कपूरचा (Karisma Kapoor) घटस्फोटीत पती संजय कपूरच्या (Sunjay Kapoor) 30 हजार कोटींच्या संपत्तीचा वाद चर्चेत आहे. करिष्मा कपूरचा मुलगा आणि मुलीनं दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात एक याचिका दाखल करुन वडिलांच्या संपत्तीत आपला हिस्सा मागितला आहे. करिष्मा आणि प्रसिद्ध बिझनेसमन संजय कपूर यांचा घटस्फोट 2016 मध्येच झालेला. त्यावेळी दोघांमधील नात्यात फारच मतभेद निर्माण झालेले आणि एकमेकांवर गंभीर आरोप करत, दोघांनी नातं संपवलं होतं. त्यावेळी घटस्फोट घेताना संजय कपूरनं तब्बल 70 कोटी रुपयांची पोटगी आणि आपला वडिलोपार्जित बंगला करिष्माच्या नावावर केलेला. हे ऐकून तुम्हाला वाटलं असेल की, हाच बॉलिवूडचा सर्वात महागडा घटस्फोट होता. पण, नाही... एक असा सुपरस्टार आहे, ज्यानं घटस्फोटानंतर कथितरित्या आपल्या पत्नीला तब्बल 380 कोटींची पोटगी दिलेली.
बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांच्या लग्नापेक्षा त्यांचा घटस्फोट चर्चेत राहिला. काही जोडप्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात उदाहरणं निर्माण केली, तर काहींच्या नात्याचा दुःखद अंत झाला. अनेकांनी तर, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांचा अपमानही केला. तर काहींनी, आपलं लग्न मोडलं, पण त्यांच्या मुलांसाठी सौहार्दपूर्ण नातेसंबंध टिकवून ठेवले.
ऋतिक रोशन आणि सुझान खानचा घटस्फोट
आपण ज्या जोडप्याचा घटस्फोट आणि पोटगीबद्दल बोलत आहोत, ते असंच एक जोडपं आहे. घटस्फोटानंतर दोघांनीही वेगवेगळे मार्ग निवडले, पण एकमेकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध राखले. आम्ही बॉलिवूडच्या ज्या स्टार कपलबाबत बोलत आहोत, त्यांचं नाव आहे, हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुझान खान (Sussanne Khan).
14 वर्षांनी लग्न मोडलं, 380 कोटी म्हणजेच, 3.8 अब्ज पोटगी द्यावी लागली
काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2000 मध्ये हृतिक रोशन आणि सुझानचं लग्न झालं. 2013 मध्ये त्यांनी वेगळं होण्याची घोषणा केली आणि 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मीडिया रिपोर्टनुसार, सुझाननं हृतिक रोशनकडून 400 कोटी रुपयांची पोटगी मागितली होती. पण, हृतिकनं हे वृत्त फेटाळून लावलेलं. दरम्यान, असं म्हटलं जातं की, त्यावेळी अभिनेत्यानं सुझानला 380 कोटी रुपयांची पोटगी दिली होती. पण हृतिक किंवा सुझानकडून याबद्दल कधीही काहीही सांगण्यात आलेलं नाही. त्यांचा घटस्फोट हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट असल्याचं म्हटलं जातं.
2010 पासूनच हृतिक-सुझानमध्ये निर्माण झालेले मतभेद
हृतिक रोशन आणि सुझानचा घटस्फोट का झाला? याचं कारण कधीच समोर आलेलं नाही आणि या जोडप्यानं ते आजतागायत उघड केलेलं नाही. पण मीडिया रिपोर्टनुसा, 2010 मध्ये 'काइट्स' चित्रपटादरम्यान, हृतिक आणि सुझानमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या समोर आल्या.त्यानंतर हृतिकचे नाव हॉलिवूड अभिनेत्री बारबरा मोरीसोबत जोडलं जाऊ लागलं. 2014 पर्यंत हृतिक आणि सुझानच्या वेगळं होण्याच्या बातम्या येत राहिल्या आणि त्यानंतर 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
हृतिक रोशनच्या वडिलांनी सांगितलेलं घटस्फोटाचं कारण
त्याच वेळी, हृतिक रोशनचे वडील आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनी त्यांच्या मुलाच्या घटस्फोटाचं कारण गैरसमज असल्याचं सांगितलेलं. राकेश रोशन यांनी 'युवा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं की, हृतिक रोशन आणि सुझानचं नातं गैरसमजाला बळी पडलं. जे काही घडलं, ते त्यांच्यातच घडलं आणि त्यांनी त्यांचे मतभेद सोडवायला हवे होते. राकेश रोशन म्हणाले होते की, 'तेच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्यातच गैरसमज होते आणि त्यांनी ते सोडवायला हवे होते...' दरम्यान, सध्या हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे, तर सुझान टीव्ही स्टार अली गोनीचा चुलत भाऊ अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :