Blood Donation Camp On PM Narendra Modi Birthday: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी () 17 सप्टेंबर रोजी आपला 75वा वाढदिवस साजरा करणार आहेत. यानिमित्तानं अभिनेता विवेक ओबेराय (Actor Vivek Oberoi) गुजरातमधील (Gujarat) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आजवरचं देशातील सर्वात मोठं रक्तदान शिबिर आयोजित करणार आहे. यानिमित्तानं अभिनेत्यानं लोकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहून रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराबाबत आयएएनएसशी बोलताना विवेक ओबेरायनं सांगितलं की, "अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद गेल्या 11 वर्षांपासून ही मेगा रक्तदान मोहीम राबवत आहे. आम्ही 2014 मध्ये याची सुरुवात केली. मी त्याचा राजदूत झालो आणि रक्तदान करणारा मी पहिला होतो. त्याच वर्षी आम्ही 1,00,212 युनिट रक्तदानाचा विक्रम केला."
यंदाचं रक्तदान शिबिर खूप खास : विवेक ओबेराय
"यंदाचं रक्तदान शिबिर खूप खास असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक शिबिर आयोजित करणार आहोत. यंदा मोदी त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करणार आहेत, त्यामुळे 75000 फर्स्ट डोनर्स असतील. आम्ही 75 देशांमधील 7500 केंद्रांवर रक्तदानासाठी शिबिरं आयोजित करणार आहोत. हा आपल्या सर्वांसाठी एक खास दिवस असेल. यावेळी आम्ही 3 लाख युनिटपेक्षा जास्त रक्त गोळा करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे..."
पूर्वी मला सुईची भीती वाटत होती, पण : विवेक ओबेराय
रक्तदान करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना विवेक ओबेराय म्हणाला की, "पूर्वी मला सुईची भीती वाटत होती, पण रक्तदानाचं महत्त्व कळताच मी रक्तदान करायला सुरुवात केली. आता मी दरवर्षी रक्तदान करतो. रक्तदान केल्यानंतर मला सुपरमॅनसारखं वाटतं..."
विवेक ओबेराय पुढे म्हणाला की, "पंतप्रधान मोदींचा वाढदिवस येतोय, मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. ते देशसेवेत गुंतलेले आहेत. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी उल्लेखनीय काम केलं आहे, हे आपल्याला खूप प्रेरणा देतं. म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण देशहिताचं काहीतरी करण्याचा संकल्प केला पाहिजे..."
दरम्यान, विवेक ओबेरायनं 2019 मध्ये आलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात पंतप्रधानांची भूमिका साकारली आहे. त्याचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं होतं. अनिरुद्ध चावला आणि विवेक ओबेराय यांनी ते लिहिलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :