Devendra Fadnavis: अलमट्टीची उंची वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारनं केला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात त्याविरोधात जाऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कर्नाटक सरकारकडून पुन्हा एकदा अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी अलमट्टी उंची वाढणे धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान 2019 साली झालेल्या करारानुसार 15 ऑगस्टपूर्वी कर्नाटकने अलमट्टीतील पाणीसाठा 517 मीटरपेक्षा खाली ठेवायचा आहे, पण कर्नाटकने हा करार पाळलेला नाही. 2021 आणि 2023 सालच्या महापुरात हे दिसून आले होते. कर्नाटकने जून-जुलैमध्येच अलमट्टी धरण पूर्ण भरून घेतले होते. परिणामी, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचे पाणी चालल्यानंतर कर्नाटकने अलमट्टीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानंतर महापूर ओसरला होता.
सरकार नेपाळमधील पर्यटकांच्या संपर्कात
दरम्यान, नेपाळमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे अनेक पर्यटक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील पर्यटक नेपाळमध्ये आहेत त्यांना भारत सरकारने व्यवस्था केली आहे. आपलं सरकार त्यांच्या संपर्कात आहे. त्यांनी पुढे सांगितले की, अलीकडील काळात जो विरोधी पक्ष आहे त्यांनी विरोधाची अशी पातळी गाठली आहे ते आता देश विरोधी व्यक्ती विरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. विरोधी पक्षाने भूमिका घ्यायची आहे त्यांनी धोरणे, योजनांचा विरोध करावा. मात्र, देशाचा विरोध त्यांनी करु नये, असे त्यांनी नेपाळमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर सांगितले.
गुंतवणुकीत ाने आघाडी घेतली
त्यांनी पुढे सांगितले की, आज आनंद वाटतो की गुंतवणुकीत आपण जी आघाडी घेतली आहे. पुन्हा एकदा 1 लाख 500 हजार कोटींचे करार झाले आहेत. ज्यातून 47 हजार जणांना रोजगार मिळाला आहे. डेटा सेंटरची उभारणी मध्ये होईल. , नंदूरबारमध्ये 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक ज्यातून 600 लोकांना रोजगार मिळाला आहे. विदर्भात रिलायन्स फूड पार्क आणि शीतपेय पार्क तयार करणार आहे. 1500 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. अदानींची देखील ७० हजार कोटींची गुंतवणूक असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या