Ind vs Aus 2nd ODI Virat Kohli VIDEO: मान खाली, हात वर..., विराटने चाहत्यांना केलं अलविदा, कोहलीच्या कृतीनं भारतीयांना भरली धडकी

Ind vs Aus 2nd ODI Virat Kohli VIDEO: मान खाली, हात वर..., विराटने चाहत्यांना केलं अलविदा, कोहलीच्या कृतीनं भारतीयांना भरली धडकी
By : | Updated at : 23 Oct 2025 02:12 PM (IST)

Ind vs Aus 2nd ODI Virat Kohli:टीम इंडियाचा किंग विराट कोहली (Virat Kohli) सलग दुसऱ्या सामन्यात (Australia vs India 2nd ODI) शून्यावर बाद झाला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात देखील विराट कोहलीला खाते उघडता आले नव्हते. त्यानंतर आजच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील विराट कोहली शून्यावर बाद झाला. कर्णधार शुभमन गिलच्या रूपात भारताची पहिली विकेट पडली तेव्हा 7 व्या षटकात विराट कोहली फलंदाजीसाठी आला. अ‍ॅडलेडच्या याच मैदानावर मागील चार डावांमध्ये विराट कोहलीने दोन शतके झळकावली होती, त्यामुळे कोहलीकडून मोठी खेळी अपेक्षित होती.

पण आज विराट कोहली एकही धाव करु शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटने एकाच षटकात शुभमन गिल आणि कोहलीला बाद केले. दरम्यान, विराट कोहली बाद झाल्यानंतर त्याने केलेल्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. विराट कोहलीनं चाहत्यांना केलं अभिवादन- (Virat Kohli Retirement) विराटची तंदुरुस्ती उत्तम असली तरी तो लवकरच एकदिवसीय सामन्यांमधूनही (Virat Kohli Retirement) निवृत्त घेईल, अशी चर्चा रंगली आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद होऊनही विराट कोहलीने हात वर करुन चाहत्यांचे आभार मानले.

ऑस्ट्रेलियातील ॲडलेडचं मैदान कोहलीच्या आवडत्या स्टेडियमपैकी एक आहे. या मैदानात त्याची फलंदाजी पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन चाहत्यांनीही मोठी गर्दी केली होती. पण विराट कोहली खातेही न उघडता माघारी फिरला. मैदान सोडताना विराट कोहलीनं चाहत्यांना अभिवादन करत मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

त्यामुळे भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा धडकी भरली आहे. भारताकडून रोहित शर्माच्या सर्वाधिक धावा- (Rohit Sharma Ind vs Aus 2nd ODI) भारताकडून शुभमन गिलने 9, रोहित शर्मा 73, विराट कोहली 0, श्रेयस अय्यर 61, अक्षर पटेल 44, केएल राहुल 11, वॉशिंग्टन सुंदर 12, नितीश कुमार रेड्डी 8, हर्षित राणा 24, अर्शदीप सिंगने 13 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स पटकावल्या. तर जेवियर बार्टलेट 3 विकेट्स आणि मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या सामन्यासाठी भारताची Playing XI:(Team India Playing XI) यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर,अक्षर पटेल, केएल राहुल, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर दुसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची Playing XI:(Australia Playing XI) मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅट शॉर्ट, मॅट रेशॉन, अ‍ॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झांपा, जोश हेझलवूड.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:संबंधित बातमी:.

📚 Related News