Kelsey Grammer Becomes Dad At Age Of 70:एखाद्या सेलिब्रिटी जोडप्यानं आपली प्रेग्नंसी अनाउंस केली की, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. सेलिब्रिटी आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना नेहमीच कुतूहल असतं. सध्या एका अभिनेत्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सुप्रसिद्ध अभिनेता 70 वर्षांचा आहे. नातवंड खेळवण्याच्या वयात या अभिनेत्यानं 46 वर्षांच्या बायकोसोबत आपल्या आठव्या मुलाला जन्म दिला आहे.
तर 46 वर्षांच्या अभिनेत्रीचं हे चौथं मूल आहे. 70 वर्षांचा हॉलिवूड टीव्ही स्टार केल्सी ग्रॅमरनं कुटुंब नियोजन धाब्यावर बसवून आपल्या कुटुंबाचा विस्तार सुरूच ठेवला आहे. अलिकडेच अभिनेत्यानं आपल्या आठव्या मुलाचं स्वागत केलं आहे. 'चीअर्स' आणि 'फ्रेझियर' सारख्या शोमध्ये दिसणारा अभिनेता केल्सी ग्रॅमर या वर्षी फेब्रुवारीमध्ये 70 वर्षांचा झाला. तो आता आठ मुलांचा पिता आहे.
'पॉड मीट्स वर्ल्ड' पॉडकास्टवरील कार्यक्रमादरम्यान, ग्रॅमरने घोषणा केली की, त्यानं आणि त्याची पत्नी केट वॉल्श यांनी त्यांच्या चौथ्या मुलाचं स्वागत केलंय. हे अभिनेत्याचं आठवं मूल आहे. केल्सी ग्रॅमर आठव्यांदा बनलाय बाप एका पॉडकास्टमध्ये बोलताना केल्सी ग्रॅमर म्हणाला की, "आम्ही आमच्या चौथ्या मुलाचं स्वागत केलंय. आता आठ जणांचं कुटुंब झालंय. ख्रिस्तोफर, तोच आहे, जो नुकताच कुटुंबात सामील झालाय.
" एमी पुरस्कार विजेता केल्सी ग्रॅमर हा एक अनुभवी टीव्ही अभिनेता आहे. त्यानं सांगितलंय की, त्याचा नवजात मुलगा एपिसोड रेकॉर्ड होण्याच्या 'तीन दिवस' आधी जन्माला आला होता. त्यानं पॉडकास्ट होस्ट रायडर स्ट्रॉंग, डॅनियल फिशेल आणि विल फ्रीडल यांच्याशी गमतीत बोलताना अभिनेता म्हणाला की, माझ्याकडे आता वेगवेगळ्या वयाच्या मुलांचा ग्रुप आहे. ग्रॅमर आणि 46 वर्षांची केट वॉल्शनं 2011 मध्ये लग्न केलेलं. कपल्सला एक टीनएज मुलगी आणि दो मुलंही आहेत.
पीपल मॅग्झिननं जूनमध्ये सांगितलेलं की, हे कपल पुन्हा एकदा आई-वडील बनणार आहेत. लंडनमध्ये फिरतानाचे दोघांचे फोटो व्हायरल झालेले. पाच वेळा एमी विनर असलेल्या ग्रामरनं आजवर चार लग्न केलीत. वॉल्शच्या आधी त्याचं लग्न डान्सर-मॉडल कॅमिल डोनाटाची सोबत झालेलं. यापूर्वी ली-ऐन चुहानीशी आणि त्याहीही आधी डांस इंस्ट्रक्टर डोरीन एल्डरमॅनसोबत झालेलं.
केल्सी ग्रॅमरची आणखी सात मूलं आहेत, ज्यामध्ये सर्वात मोठी अभिनेत्री स्पेंसर ग्रॅमर आहे. उतारवयात वडील बनल्यामुळे खूश आहे, केल्सी ग्रॅमर सिटकॉम स्टार केल्सी ग्रामर, ऑक्टोबर 2011 मध्ये आजोबा बनलेला. त्याची मुलगी स्पेन्सरनं आपला एक्स-हसबंडसोबत त्यावेळी एका मुलाला जन्म दिलेला. तसेच, एका जुन्या मुलाखतीत बोलताना केल्सी ग्रामरनं 'वयोवृद्ध वडील असण्याच्या सौंदर्याबाबत' चर्चा केलेली. त्यानं 2018 मध्ये 'द गार्जियन'शी बोलताना सांगितलं की, आयुष्याच्या उत्तरार्धात मुलांना वाढवताना त्याला 'पुन्हा प्रयत्न करण्याची संधी' मिळाल्यामुळे भाग्यवान असल्यासारखं वाटतंय.
ही एक खरी देणगी आहे. केल्सी ग्रॅमरनं मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'केरेन ए ब्रदर रिमेम्बर्स' या पुस्तकाच्या प्रमोशन दरम्यान त्याच्या आठव्या मुलाच्या आगमनाची घोषणा केली. हे पुस्तक त्याच्या 18 वर्षांच्या बहिणीच्या क्रूर हत्येचं आणि दुःखाशी त्याच्या आयुष्यभराच्या लढाईचं वर्णन करतं. एपिसोड दरम्यान, फिशेलनं अभिनेत्याला विचारलं की, त्याच्या मुलांना त्यांच्या दिवंगत बहिणीबद्दल किती माहिती आहे. अभिनेत्यानं स्पष्ट केलं की, त्याच्या मोठ्या मुलांना तिच्याबद्दल वेगवेगळ्या प्रमाणात ज्ञान आहे, तर लहान मुलांना अधिक जाणून घेण्यासाठी आणि तिचं पुस्तक वाचण्यासाठी वाट पहावी लागेल.
तो म्हणाला की, "काही गोष्टी इतक्या क्रूर असतात की, त्यांना आत्ता त्यांचा सामना करण्याची गरज नाही. " महत्त्वाच्या इतर बातम्या :.








