Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळाले असून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आजपासून ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जातो, ज्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठा टप्पा गाठला जात असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी x माध्यमावर पोस्ट टाकत सांगितले.
महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद करणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे . दरम्यान, आतापर्यंत 13 हफ्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे . 14 वा हफ्ता मिळण्यास आजपासून सुरुवात झाली आहे .
लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज ! ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला सुरुवात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. असेही महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी x माध्यमावर सांगितलं.
344.30 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाला वर्ग
ाच्या सामाजिक न्याय विभागानं ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक लाभाच्या वितरणासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यासंदर्भातील शासन निर्णय 9 सप्टेंबरला जारी करण्यात आला होता. त्यामुळं ऑगस्ट महिन्याच्या लाभाचं वितरण करण्यासंदर्भातील एक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलीय.
लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याच्या लाभाची प्रतीक्षा संपली
महायुती सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. ही योजना महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी महिलांना दरमहा 500 रुपये दिले जातात. ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 13 हप्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभाचं वितरण करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला रक्कम वर्ग करण्यात येते. त्याप्रमाणं सामाजिक न्याय विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाच्या वितरणासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे.