Navneet Rana मोठी बातमी: मुलांसमोर अत्याचार करुन मारुन टाकू; नवनीत राणांना हैदराबादमधून टोकाची धमकी

Navneet Rana मोठी बातमी: मुलांसमोर अत्याचार करुन मारुन टाकू; नवनीत राणांना हैदराबादमधून टोकाची धमकी
By : | Edited By: मुकेश चव्हाण | Updated at : 29 Oct 2025 11:56 AM (IST)

Navneet Rana :भाजपच्या नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हैदराबादवरून जावेद नावाच्या व्यक्तीकडून अत्याचार करुन मारुन टाकण्याची पत्राद्वारे धमकी दिली आहे. नवनीत राणा यांना हेद्राबाद येथील जावेद या व्यक्तीने नवनीत राणा यांच्या पत्त्यावर स्पीडपोष्टद्वारे पत्र पाठवून धमकी दिली आहे. माझ्याकडे 50 जणांची गँग असून तुझ्यावर गँगरेप करुन मारुन टाकू, असं धमकीच्या पत्रात म्हटलं आहे. राजापेठ पोलीसांनी नवनीत राणा यांच्या स्वीय सहाय्यक यांच्या जबानी रिपोर्टवरून गुन्हा दाखल करून पोलिसांकडून सध्या तपास सुरु करण्यात आला आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:संबंधित बातमी:.

📚 Related News