Premanand Maharaj : प्रेमानंद महाराज हे एक महान संत आहेत. त्यांच्या वृंदावन येथील सत्संगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्यांच्या सरळ, स्पष्ट वाणीने अनेकजण प्रभावित होतात. त्यांचं प्रवचन फक्त भक्तीपर्यंतच मर्यादित नाही तर जीवनाची दिशा बदलवणारे संकेतही देतात. प्रेमानंद महाराजंची ख्याती देशभरात पसरली आहे.
वृंदावन महाराजांच्या प्रवचनासाठी तसेच, आपल्या समस्या घेऊन अनेकजण त्यांच्या आश्रमात जातात. प्रवचनात अनेक भक्त त्यांना प्रश्न विचारतात. असाच एक प्रश्न एका भक्ताने महाराजांना विचारला असता. महाराजांनी जे उत्तर दिलं त्याने सगळेच अचंबित झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, एका भक्ताने महाराजांना पितृपक्षात कांदा, लसूण खावं की खाऊ नये? असा प्रश्न विचारला. यावर प्रेमानंद महाराजांनी जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे.
भक्ताच्या प्रश्नाला प्रेमानंद महाराजांनी दिलं उत्तर
भक्ताच्या प्रश्नांना उत्तर देत प्रेमानंद महाराज म्हणाले की, कांदा आणि लसणाची उत्पत्ति ही जमिनीतून होते. कांदा आणि लसणाचा प्रभाव गरम असल्या कारणाने ते खाल्ल्याने आपल्यामध्ये क्रोधाची भावना निर्माण होते. जर तुम्ही भक्तीच्या मार्गाने जात असाल तर तिथे क्रोधाला काही स्थान नाही. त्यांनी मांसाहारी पदार्थांशी देखील कांदा,लसणाची तुलना केली नाही. कारण मांसाहारी पदार्थ एखाद्या जीवित प्राण्याची हत्या करुन खातात. यासाठी जे लोक भक्तीच्या मार्गावर आहेत त्यांनी कांदा आणि लसूण खाऊ नये. जर याचं सेवन केल्यास पितर नाराज होतात.
पितृपक्ष 2025 (Pitru Paksha 2025)
सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरु आहे. पंधरा दिवसांचा हा कालावधी असल्याने याला पितृपक्ष पंधरवडा म्हणतात. मान्यतेनुसार, या काळात पितर पृथ्वीतलावर येतात. तसेच, या काळात पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. यासाठी श्राद्ध, तर्पण केलं जातं.