Solapur News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सोलापुरात महाविकास आघाडीत वादाचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात मतभेद उघडपणे समोर आले आहेत. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर तीव्र टीका करत “त्या आमच्यासाठी चिल्लर आहेत” अशा खोचक शब्दात टीका केली आहे. “गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेसोबत आम्ही युती करणार नाही”. आघाडी तुटली तरी चालेल, पण त्यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही.
” त्यांनी पुढे आरोप केला की, “उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाचा अवमान करणारी प्रणिती शिंदे महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यात अपयशी ठरल्या आहेत. विरोधकांशी हातमिळवणी करून आघाडीला मातीत आणि गाळात नेऊन ठेवले. ” “उद्धव साहेबासमोर झोळी पसरवून खासदार झाल्या” शरद कोळी यांनी आपला संताप व्यक्त करत प्रणिती शिंदेंवर वैयक्तिक टीका केली. “उद्धव साहेबांसमोर मतासाठी झोळी पसरवून खासदार झालेल्या प्रणिती शिंदे आज मोठेपणा दाखवतात. पण शिवसेनेमुळे खासदार झाल्याचं भान त्यांना राहिलेलं नाही.
” कोळी यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रणिती शिंदेंना सांगितलं होतं, “शिवसेनेमुळे तुम्ही खासदार झाला आहात; आघाडीचा धर्म पाळा. ” पण प्रणिती शिंदे यांनी तो आदेश पाळला नाही, त्यामुळे त्या “आमच्यासाठी चिल्लर आहेत”, असं कोळी म्हणाले. “आघाडी चालेल, पण नेतृत्व मान्य नाही” शरद कोळी यांनी स्पष्ट केलं की ठाकरे गटाला काँग्रेससोबत आघाडी करण्यात हरकत नाही, पण प्रणिती शिंदेंचं नेतृत्व कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटातील तणाव वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. इतर महत्वाच्या बातम्या.








