मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; अजितदादांची स्पष्टोक्ती, टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार?

मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; अजितदादांची स्पष्टोक्ती, टीकेची झोड उठलेल्या चाकणकरांवर कारवाई होणार?
By : | Edited By: परशराम पाटील | Updated at : 30 Oct 2025 03:51 PM (IST)

Ajit Pawar on Rupali Chakankar: राज्य महिला आयोगासारख्या घटनात्मक पदावर असूनही रूपाली चाकणकर यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून अत्यंत बेजबाबदारपणे वक्तव्य केली जात असल्याची सडकून टीका विरोधकांकडून होत आहे. फलटणमधील डॉक्टर युवतीने केलेल्या आत्महत्येनंतर रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संतापाची लाट असल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रूपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यांशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. आज युवतीच्या कुटुंबीयांशी अजित पवार यांनी रूपाली ठोंबरे यांच्या फोनवरून संवाद साधला. यावेळी बोलताना या न्यायाच्या लढाईमध्ये मी तुमच्यासोबत असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.

मी नेहमी सत्याच्या बाजूने असतो. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी आलेला रूपाली चाकणकर यांना कारवाईचा झटका बसणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. महिला आयोगावर सातत्याने विरोधकांकडून ताशेरे ओढले जात आहेत. रूपाली चाकणकर मृत डॉक्टरची बदनामी करत आहेत दुसरीकडे, सुषमा अंधारे म्हणाल्या की, पीडितेला न्याय मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे सोडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर मृत डॉक्टरची बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लक्ष घालून जबाबदार माणसाला आयोगावर नेमावे आणि आयोगाची इभ्रत राखावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ती गेल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी त मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. चाकणकर यांनी फलटणमध्ये जाऊन घेतलेल्या पत्रकार परिषदेत मृत डॉक्टर युवतीचे चारित्र्यहनन केले. ती युवती कितीजणांशी मोबाइलवरून बोलत होती, याची माहिती माध्यमांसमोर दिली. जरी ती दोन मुलांबरोबर बोलत असेल तरी तिला मारण्याचा अधिकार कुणी दिला? ती गेल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? असे सवाल अंधारे यांनी चाकणकरांना विचारले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महिला आयोग अध्यक्षांच्या नियुक्ती प्रकरणात लक्ष घालून जबाबदार व्यक्तीला पदावर नेमावे. पुनर्वसनासाठी पदाचा वापर होऊ देऊ नका. पक्षाची आणि महिला आयोगाची इभ्रत राखा, असेही अंधारे तटकरेंना उद्देशून म्हणाल्या. इतर महत्वाच्या बातम्या.

📚 Related News