Astrology Yog :वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीने संक्रमण करतात. यामुळे अनेक शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. येत्या 3 नोव्हेंबर 2025 रोजी दोन सर्वात शुभ ग्रह शुक्र आणि गुरु ग्रह एकमेकांच्या 90 अंशावर असतील. शुक्र-गुरु ग्रहाच्या शुभ योगाला समकोण योग किंवा केंद्र दृष्टी योगदेखील म्हणतात. तसेच, यामुळे काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे.
या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. धनु रास (Saggitarius Horoscope) धनु राशीच्या लोकांसाठी केंद्र दृष्टी योग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना वेळोवेळी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून तुमच्या रखडलेल्या योजना तुम्ही या काळात पूर्ण करु शकता.
तुमच्या आत्मविश्वासात देखील चांगली वाढ झालेली दिसेल. नवीन घर घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. शत्रूवर विजय मिळवण्याची हीच संधी आहे. वृषभ रास (Taurus Horoscope) वृषभ राशीसाठी शुक्र आणि गुरु ग्रहाचा समकोण योग सकारात्मक परिणाम देणारा ठरणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील.
कामाच्या ठिकाणी चांगल्या ओळखी निर्माण होतील. तसेच, तुमच्या पद प्रतिष्ठेत चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या मनातील एखादी इच्छादेखील या काळात पूर्ण होण्याची शक्यता. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. तूळ रास (Libra Horoscope) केंद्र दृष्टी योग निर्माण झाल्याने तूळ राशीच्या लोकांचे लवकरच अच्छे दिन सुरु होतील.
या काळात देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असेल. उत्पन्नात वाढ झालेली पाहायला मिळेल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. या काळात धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. धनसंपत्तीत भरभराट होईल.
कुटुंबियांबरोबर तुम्ही छान वेळ घालवाल. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ).








