Eknath Khadse Robbery: आता सीडी लावतो म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरातून 'ती' सीडी अन् पेनड्राईव्ह गायब; नाथाभाऊंच्या दाव्यानं एकच खळबळ

Eknath Khadse Robbery: आता सीडी लावतो म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरातून 'ती' सीडी अन् पेनड्राईव्ह गायब; नाथाभाऊंच्या दाव्यानं एकच खळबळ
By : | Edited By: Rohit Dhamnaskar | Updated at : 29 Oct 2025 02:44 PM (IST)

Eknath Khadse Robbery: राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. सुरुवातीला यामध्ये खडसे यांच्या घरातील सोने-चांदीचे दागिने आणि काही रोकड रक्कम चोरीला (Robbery) गेल्याचे सांगितले जात होते. मात्र, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक खळबळजनक दावा केला. त्यानुसार चोरट्यांनी एकनाथ खडसे यांच्या घरातील आणखी काही मौल्यवान आणि अत्यंत महत्त्वाचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये काही सीडी, पेनड्राईव्ह आणि कागदपत्रांचा समावेश आहे.

(Jalgaon News) एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात 27 ऑक्टोबरच्या रात्री चोरी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप फोडले होते. यानंतर चोरट्यांनी घरातून सहा ते सात तोळे सोने आणि 35 हजारांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, एकनाथ खडसे यांनी नंतर आणखी बारकाईने पाहिले असता त्यांच्या घरातून सीडी, पेनड्राईव्ह आणि कागदपत्रंही गायब असल्याचे लक्षात आले. या सीडी आणि पेनड्राईव्हमध्ये नक्की काय होते, याची चर्चा आता रंगली आहे.

या सगळ्याबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी सांगितले की, आपल्या घरातील चोरीवेळी चोरट्यांनी कागदपत्र आणि सीडी चोरून नेण्यामागे चोरट्यांचा काय उद्देश होता, याचा देखील तपास पोलिसांनी करायला हवा. राजकीय नेत्याच्या घरातील चोरी असल्यानेपोलिसांच्या दृष्टीने ही चोरी शोधून काढणे प्रतिष्ठेचे असल्याने पोलीस या चोरीचा शोध लावतील ,असा आपल्याला विश्वास आहे. आपल्या घरात चोरी झालेली कागदपत्रं ही आपण माहिती अधिकारात मागविलेली भ्रष्टाचार विषयाची कागद पत्र होती. तर सीडीमध्येही काही महत्वाचा मजकूर होता. मात्र, याबाबत आपण काहीही बोलू इच्छित नाही.

काल एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी चोरी झाल्याचं समोर आल्याच्या नंतर आज एकनाथ खडसे हे हून जळगाव येथे चोरी झालेल्या घराच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या घरातून सोने,चांदी यासह महत्वाची कागदपत्रं ,पेन ड्राइव्ह आणि काही महत्वाच्या सीडी ही चोरीस गेल्याच दिसून आले. आपल्या घरात कुठे काय ठेवले आहे, याची माहिती असल्याशिवाय अशी महत्वाची कागदपत्रं कोणी चोरून नेऊ शकत नाही. चोरी करण्यापूर्वी आपल्या घराच्या परिसरातील लाईट बंद होते. त्यानंतर चोरी होते, याचा ही पोलिसांनी तपास करायला हवा, अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.

आणखी वाचा.

📚 Related News