Beed Crime Ex deputy sarpanch death: गोविंदचा जीव पूजावर; तिचं प्रेम पैशांवर, हट्टापाई उपसरपंचाचा हकनाक बळी, गेवराईचा बंगला तिच्या मनात भरला अन्...

Beed Crime Ex deputy sarpanch death: गोविंदचा जीव पूजावर; तिचं प्रेम पैशांवर, हट्टापाई उपसरपंचाचा हकनाक बळी, गेवराईचा बंगला तिच्या मनात भरला अन्...
By : | Edited By: Ankita Khane | Updated at : 11 Sep 2025 11:46 AM (IST)

वैराग: गेवराई तालुक्यातील लुखमसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय ३४) यांच्या आत्महत्येप्रकरणी सासुरे (ता. बार्शी) येथील कला केंद्रातील नर्तिका पूजा देवीदास गायकवाड (२१) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सासुरे गावातच गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या गाडीतून स्वतःच्या पिस्तुलाने गोळी झाडून जीवन संपवलं. या घटनेनंतर वैराग पोलिसांनी आत्महत्येत वापरलेल्या पिस्तुलाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान या घटनेच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान पूजा ही गोविंद बर्गे यांना वारंवार कोणत्या ना कोणत्या गोष्टींची मागणी करायची, धमक्या द्यायची, या सर्व मानसिक त्रासाला ते कंटाळले होते, अशी माहिती त्यांच्या मित्रांनी दिली आहे.

पुजाला तो बंगला आवडला अन्...

गोविंद बर्गे यांनी गेवराई येथे बंगला बांधला होता. या बंगल्यामध्ये नर्तकी पूजा ही दोन दिवस राहिली होती. पुजाला गेवराईतील तो बंगला आवडला. त्यामुळे तिने तो बंगला माझ्या नावावर कर म्हणून हट्ट धरला होता. दरम्यान, गोविंद बर्गे यांनी मी तुला दुसरा बंगला बांधून देतो असं पूजा म्हटलं होतं. आपल्या प्रकरणाची माहिती वडील व बायकोला झाल्यास माझी बदनामी होईल असंही त्यांनी पूजाला सांगितले होते. तरीसुद्धा पूजाने माझा वाढदिवस 15 सप्टेंबरला आहे. त्याअगोदर बंगला नावावर करा आणि भावाला पाच एकर जमीन घेऊन द्या म्हणून तगादा लावला होता. जर बंगला नावावर नाही केला तर बलात्कार केल्याची तक्रार करण्याची धमकी दिल्याने गोविंदचा बळी गेला असल्याचं नातेवाइकांनी म्हटलं आहे.

तीन दिवसांची पोलिस कोठडी

बार्शी तालुक्यातील सासुरे येथे गोविंद जगन्नाथ बर्गे (रा. लुखा मसला, ता. गेवराई, जि. ) यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, दि. ९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी नर्तकी पूजा देवीदास गायकवाड (वय २१, रा. सासुरे, ता. बार्शी) हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पूजाला वैराग पोलिसांनी ताब्यात घेऊन बार्शी न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

नेमकं काय घडलं?

गोविंद यांनी गेल्या आठ दिवसांपासून सर्व इनकमिंग कॉल बंद केले होते. दि ८ सप्टेंबरला गोविंद हे तुळजाभवानी कला केंद्रावर गेले. त्यांनी तिथे मॅनेजरला पूजाच्या मैत्रिणीला बोलावून घेऊन मला पूजाला बोलायला सांगा असे म्हणाले. तेव्हा पूजाने गोविंदच्या बरोबर बोलण्यास नकार दिला. पूजाने बोलण्यास नकार दिल्याने गोविंद हे ८ सप्टेंबर रोजी रात्री कारने पूजाच्या आईच्या घरी सासुरेमध्ये गेले. त्यानंतर दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या पूर्वी गोविंद कारचे दरवाजे लॉक करून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

आठ दिवसांपासून गोविंदचे इनकमिंग कॉल बंद

मात्र माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मित्र परिवारांनी शंका उपस्थित करत या प्रकरणाची योग्य चौकशीची मागणी केली. गोविंद बर्गे आत्महत्या करतील असं वाटत नाही. आम्ही रोज त्यांच्यासोबत होतो. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून उपसरपंच गोविंद बर्गे मानसिक तणावात होते. मागील पाच ते सहा दिवसांपासून ते अधिक तणावात होते. त्यांचा मोबाईल बंद होता. अशी माहिती त्यांच्या मित्र परिवारांना दिली. घटनेच्या ठिकाणी गेलो असता तेथे एक बाब निदर्शनास आली. मानसिक तणावाखाली येऊन ही घटना झाली. मागील पाच ते सहा दिवसांपासून त्यांचा कुणाशीही संपर्क नव्हता. त्यांचा फोनही लागत नव्हता. आणि त्यांचा कुणाशीही संवाद नव्हता. त्यामुळे आमच्या असं लक्षात येत हा घात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी गोविंद बर्गे यांच्या मित्र परिवाराने केली.

ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं

गोविंद बरगे हे लुखा मसाला (ता. गेवराई) येथील माजी उपसरपंच होते. ते ठेकेदारीचा व्यवसाय करत होते. बरगे हे तुळजाभवानी कला केंद्र (रा. पारगाव, ता. वाशी, जि. ) येथे जात होते. या कला केंद्रात नर्तकी म्हणून काम करणारी पूजा गायकवाड हिच्याशी मयत गोविंद यांची ओळख झाली होती.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पूजाने गोविंद यांना मी तुमची मालकीण म्हणून राहते, तुम्ही माझे घरखर्च व माझा संसार पाहायचा, असे म्हणून प्रेमसंबंध निर्माण केले. गोविंद यांनी नर्तकी पूजा व तिच्या नातेवाइकांच्या फोन पे वर अनेक वेळा पैसे पाठवून तिचा खर्च पूर्ण करत होते. पूजा व तिच्या भावास महागडा मोबाइल, बुलेट घेऊन दिली. पूजा हिची आई 3 राहत असलेल्या सासुरे गावी बांधकाम, तुळजाभवानी कला केंद्रात असलेल्या पूजाच्या मावशीच्या नावे वैराग येथे प्लॉट, नातेवाइकांच्या नावे तीन एकर शेतजमीन घेऊन दिली. सोने नाणे घेऊन दिले, अशी माहिती आहे.

📚 Related News