बीड : जन्मजात मुलांची वयाच्या तीन वर्षांपर्यंत अत्यंत लहान-सहान बाबी लक्षात घेऊन काळजी घेतली जाते. दूध प्यायला किंवा काही पदार्थ खायला देतानाही विशेष लक्ष दिले जाते. मात्र, ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका 7 महिन्यांच्या घशाथ चॉकलेट अडकले अन् तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. त्यानंतर, चिमुकलीच्या कुटुंबीयांना आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती. त्यामध्ये, एक लहानग्या मुलाने एलईडी बल्ब गिळल्याने त्याला त्रास होत होता. अखेर, डॉक्टरांनी तो एलईडी बल्ब काढून मुलाचा जीव वाचवला होता.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांनी हादरुन सोडलेल्या बीड जिल्ह्यातील ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका 7 महिन्यांच्या मुलीच्या घशात चॉकलेट अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीच्या घशात चॉकलेट अडकल्यानंतर या चिमुकलीचा मृतदेह कुशीत घेऊन नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, उपचारापूर्वीच या घटनेत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तालुक्यातील काटवटवाडी गावातील या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आरोही आनंद खोड असे मृत मुलीचे नाव असून ती अवघ्या सात महिन्यांची होती. घरातच खेळत असताना खाली पडलेले चॉकलेट तिने तोंडांत टाकून गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चॉकलेट तिच्या घशात अडकले आणि तिचा यात दुर्दैवी अंत झाला. कोवळ्या जीवासाठी चॉकलेट काळ बनून आलं अन् चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चिमुकल्याच्या फुफ्फुसात एलईडी बल्ब
एका दुर्मिळ व असाधारण वैद्यकीय केसमध्ये तील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात अडकलेला धातूचा एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढला, ज्यामुळे तीन महिन्यांपासून त्याला सतत खोकला आणि श्वसनाचा होत असलेला त्रास अखेर दूर झाला. राहुल (गोपनीयतेसाठी नाव बदलले आहे) सुरुवातीला निदान झालेल्या न्यूमोनिया आजाराने ग्रस्त होता आणि अँटीबायोटिक्सचे अनेक औषधोपचार करण्यात आले. मोठ्या प्रमाणात काळजी घेतल्यानंतर देखील, त्याची लक्षणे कायम राहिली, ज्यामुळे त्याची प्रगत तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये सीटी स्कॅन करण्यात आले. यामधून त्याच्या डाव्या ब्रोन्कसमध्ये खोलवर धातूचा भाग असल्याचे आढळून आले होते.