Beed News: दोन्ही मुंडेच हाकेला बीड जिल्ह्यात फिरवून वातावरण दूषित करतायत; दीपक केदार यांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?

Beed News: दोन्ही मुंडेच हाकेला बीड जिल्ह्यात फिरवून वातावरण दूषित करतायत; दीपक केदार यांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?
By : | Edited By: Ankita Khane | Updated at : 11 Sep 2025 03:43 PM (IST)

बीड: ओबीसी महाएल्गारच्या नावाखाली हाकेला बीड जिल्ह्यात जाणीवपूर्वक फिरवले जात असल्याचा आरोप असल्याचा ऑल इंडिया पँथर सेना दीपक केदार अध्यक्ष यांनी केला आहे. हाकेला बीड जिल्ह्यात फिरवून "दोन्ही मुंडे" बीडचं वातावरण दूषित करत आहेत. येथे दंगल झाल्यास "दोन्ही मुंडे" जबाबदार असतील.

हाकेला बीड जिल्ह्यातून हद्दपार करा

लोकनेते गोपनाथ मुंडे सर्व जातींचे लोकनेते होते आजचे मुंडे एका जातीचे नेते झालेत.+बीडचा सामाजिक सलोखा पूर्णपणे बिघडलेला आहे.ओबीसी महाएल्गार फक्त बीड जिल्ह्यातच का? महाराष्ट्र म्हणजे बीड आहे का? असे बोलत केदार यांनी हाकेंच्या ओबीसी महाएल्गार आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. बॅनर फाडणे, पुन्हा स्टंट करणे आणि पूर्ण जिल्हा वेठीस धरणे हे योग्य नाही. या सभेतुन व्यवस्थेला नाही तर जातीला टार्गेट केलं जातं असून ओबीसी नेत्यांनी सामाजिक वातावरण दूषित करू नये असेही दिपक केदार म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणालेत दिपक केदार?

बीड जिल्ह्याचे वातावरण दूषित झालेलं आहे, बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखापूर्ण पणे बिघडलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. हाकेला जाणीवपूर्वक फिरवला जात आहे. हाकेला फिरवणारे बीड जिल्ह्यातील दोन्ही मुंडे या सर्व सभेचे आयोजन नियोजन आणि कार्यकर्ते पुरवण्याचे काम करत आहेत. या दोन्ही मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा सामाजिक सलोखा पूर्णपणे बिघडवून टाकलेला आहे. बॅनरचा इशू क्रिएट करायचा त्याआडून मोठ्या स्टंट करायचा कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांना वेठीस धरायचं. जर बीड जिल्ह्यात दंगल झाली, तर हाकेला बळ देणारे दोन्ही मुंडे या सर्वाला जबाबदार असतील, असा आमचा आरोप आहे. त्यांनी त्या ट्रॅपमध्ये अडकू नये. बीड जिल्ह्यातील मराठा ओबीसी दलित मुस्लिम यांच्यात विभाजन करू नये आणि पोलीस अधीक्षक यांना सुद्धा आमची मागणी आहे. काही प्रकरण ताजी असताना आता पुन्हा गेवराई मध्ये बॅनरचा इशू क्रिएट झाला आहे. वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या हाकेंना बीडमध्ये येऊ देऊ नये त्यांना हद्दपार करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

दोन्ही मुंडेंना देखील आवाहन करताना ते म्हणाले अशा पद्धतीने ताकद देणं चुकीचं आहे. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा लोकनेते म्हणून आहे. हा दृष्टिकोन तुम्ही जपला पाहिजे. आपण एका जातीचे नेते होऊन काही होणार नाही. लोकसभा विधानसभा अनेक निवडणुका बघितल्या. गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनच्या निवडणुका पाहिल्या. ते एका जातीपुरते मर्यादित नेते नव्हते लोकनेते गोपीनाथ मुंडे हे सर्व सर्व समावेशक आणि सर्व जातींचे नेते होते. याचं भान आजच्या दोन्ही मुंडेंनी ठेवलं पाहिजे असं आवाहन देखील केदार यांनी केलं आहे.

ओबीसींच्या उपस्थितीमध्ये एका मुंडेंचा सहभाग करून आरएसएसने त्यांना जातीपुर्त मर्यादित ठेवून त्यांचा लोकनेता ही ओळख पुसलेली आहे. लक्ष्मण हाके यांना बळ देणं हे दोन्ही मुंडेंनी थांबवावं, या सभांमध्ये रॅलीमध्येजी भाषणे होतात, ती जातीय तेढ निर्माण करणारी होत आहेत. बीडचे वातावरण दंगलीच्या उंबरठ्यावरती उभं करणार भाषण होत आहेत, भडकाऊ भाषण होत आहेत, त्यामुळे उद्या बीड पेटलं किंवा दंगल झाली, तर या हाकेंना जे जे बळ देत आहेत, ते सर्व याला जबाबदार असतील. या रॅलीमध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना नावाने जर घोषणा दिल्या जात असतील तर ओबीसी आरक्षण वाचवण्याचा आंदोलन आहे की, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा समर्थन करणारं हे आंदोलन आहे असा प्रश्न उपस्थित होतो आहे. व्यवस्थेच्या विरोधात कोणीही बोलत नाही केवळ जातीच्या विरोधात बोललं जातं आणि म्हणून बीड जिल्हा म्हणजे महाराष्ट्र आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणत्या जिल्ह्यात तुमची सभा होत नाही दर दोन दिवसाला बीडच्या कोणत्यातरी तालुक्यात सभा होते. बॅनर फाटतो. त्या ठिकाणचे वातावरण दूषित होत, कायदा व्यवस्था वेठीस धरली जाते, बीड जिल्हा म्हणजे नाही ओबीसींचा महाएल्गार म्हणायचं आणि जिल्ह्यातच सभा घ्यायच्या या पाठीमागे काय राजकारण आहे हा प्रश्न देखील आहे असेही पुढे दीपक केदार यांनी म्हटलं आहे

लक्ष्मण हाके यांच्या बॅनरला काळे फासले

च्या गेवराई तालुक्यातील शृंगारवाडी फाटा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची उद्या सभा आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. दरम्यान फुलसंगी फाटा येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर अज्ञात्यांकडून काळे फासण्यात आले. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी काळे फासलेल्या बॅनरवर दुग्धभिषेक करून घटनेचा निषेध केला आहे.

📚 Related News