सरकारी सेवा अन् योजनांचं काम व्हॉट्अपवरुन, आपलं सरकारचं दुसरं व्हर्जन येतय; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

सरकारी सेवा अन् योजनांचं काम व्हॉट्अपवरुन, आपलं सरकारचं दुसरं व्हर्जन येतय; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
By : | Updated at : 11 Sep 2025 04:55 PM (IST)

मुंबई : मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा सेवा हमी कायदा केला होता, याची आपल्याला कल्पना आहे. आता आपले सरकारचे व्हर्जन जुने झाले असून आपण समग्र नावाच्या संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार, नागरिकांना कोणत्या योजनांची निकड आहे, याचा अभ्यास केला आहे. आता आपण पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. लोकांकडून जी मागणी येते, त्यात सेवा आणि योजनांची मागणी येते. त्यामुळे, डिजिटाइज पद्धतीने सेवा देण्याचं काम सरकार सुरू करत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. तसेच, नागरिकांना आता व्हॉट्सअपवर सेवा मिळणार आहेत, त्यामध्ये 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटाइज पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार आहे, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले.

राज्यात सेवा आणि सुविधांसंदर्भातील डिजिटाइज पद्धतीचा पहिला टप्पा 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. तर, 200 सेवा आणि योजना 26 जानेवारीपर्यंत आणि संपूर्ण सेवा 1 मे पर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्‍यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सरकारकडील रेकॉर्ड वरुनच आपण माहिती भरणार आहोत. त्यामुळे, आपले सरकारचं हे दुसरं व्हर्जन येत आहे. त्यामध्ये, 4 टप्पे असतील, त्यामुळे नागरिकांना केलेला अर्ज सध्या कुठे आहे? हेही पाहाता येणार आहे. लोकांना डिजिटल सेवा मिळणं आणि प्रेडेक्टिबल होणार, व्हॉट्सॲपवर देखील सेवा उपलब्ध करुन देणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे, शासन दरबारी मारावे लागणारे खेटे कमी होतील, असेच दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील गुंतवणूक 1 लाख 500 हजार कोटी

ातील गुंतवणुकीत आपण जी आघाडी घेतली आहे, ती पुन्हा एकदा 1 लाख 500 हजार कोटींवर गेली असून याचे करार झाले आहेत. त्यामुळे, आज याचा आनंद वाटतो आहे, ज्यातून 47 हजार जणांना रोजगार मिळेल. डेटा सैंटरची उभारणी मध्ये होईल, मध्ये नंदूरबारमध्ये 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, ज्यातून 600 लोकांना रोजगार मिळेल. विदर्भात रिलायन्स फूड पार्क आणि शीतपेय पार्क तयार करणार आहोत. तिथे 1500 कोटींची गुंतवणूक करणार आहोत. अदानींची देखील 70 हजार कोटींची गुंतवणूक असणार आहे, असे म्हणत राज्यातील उद्योजकीय गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्‍यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

कर्नाटक सरकारने मेट्रो स्टेशनचे नाव बदलले

कर्नाटकातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या नामांतवरुन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. शिवाजी नगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी स्टेशन करण्याचा मी निषेध करतो. कर्नाटक सरकार शिवाजी महाराजांचा अपमान करत आहे. पण, शिवाजी महाराजांना अपमानित करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरु हे पंतप्रधान असण्यापासून आहे, असा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. तसेच, डिसकव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरुंनी लिहिलं होतं, त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे जे मत व्यक्त केलं होत, हे आपल्याला माहिती आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये सातत्याने तीच परंपर दिसत आहे. ईश्वराने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी. धार्मिक विरोधी व्यवस्था उभी करत ते तेढ निर्माण करणार नाहीत ही माझी अपेक्षा आहे, असेही फडणवीसांनी म्हटले.

हा जीआर सरसकट आरक्षण देत नाही

मराठा आरक्षण व हैदराबाद गॅझेटियरच्या विरोधात ओबीसी नेत्यांकडून याचिका करण्यात आली आहे. त्यावर, बोलताना फडणवीस म्हणाले की, याचिका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही विचार करुन जीआर काढला आहे, कोणालाही सरसकट आरक्षण हा जीआर देत नाही. पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच हा जीआर मदत करतो. मी ओबीसी समाजातील नेत्यांना सांगू इच्छितो कोणालाही सरसकट आरक्षण दिलेलं नाही, पुरावा तपासूनच आरक्षण मिळणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर, ओबीसींच्या मोर्चावर बोलताना, राजकीयदृष्टीने कोणाला काम करायचं असेल तर थांबवू शकत नाही. मात्र, जोपर्यंत आमचं सरकार आहे, आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले.

नेपाळ देश अराजकता

नेपाळमधील अराजकतेवरुन विरोधकांनी केलेल्या टीकेलाही मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय. अलिकडच्या काळात जो विरोधी पक्ष आहे, त्यांनी विरोधाची अशी पातळी गाठली आहे. ते आता देशविरोधी, व्यक्तीविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. विरोधी पक्षाने भूमिका घ्यायची असते, त्यांनी पॉलिसी, योजनांचा विरोध करावा. मात्र, देशाचा विरोध त्यांनी करु नये, असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला.

हेही वाचा

📚 Related News