संजय दत्तच्या 'लगे रहो मुन्ना भाई' सिनेमात महात्मा गांधींची भूमिका मराठमोळ्या अभिनेत्याने साकारली होती; नाव ऐकून चकीत व्हाल!

संजय दत्तच्या 'लगे रहो मुन्ना भाई' सिनेमात महात्मा गांधींची भूमिका मराठमोळ्या अभिनेत्याने साकारली होती; नाव ऐकून चकीत व्हाल!
By : | Updated at : 09 Sep 2025 04:06 PM (IST)

Lage Raho Munna Bhai Movie : ‘लगे रहो मुन्ना भाई’ हा राजकुमार हिरानी दिग्दर्शित चित्रपट 2006 साली प्रदर्शित झाला. हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता समाजाला एक महत्त्वपूर्ण संदेश देऊन गेला. महात्मा गांधींच्या विचारांना विनोदी पण भावपूर्ण पद्धतीने मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडला. ‘गांधिगिरी’ ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे कार्य या चित्रपटाने केले.

चित्रपटाची कथा त राहणाऱ्या मुन्ना उर्फ मुरली प्रसाद शर्मा आणि त्याचा साथीदार सर्किट यांच्या भोवती फिरते. मुन्ना हा गुंडगिरी करणारा, पण मनाने चांगला माणूस असतो. एका रेडिओ जॉकीच्या प्रेमात तो पडतो आणि तिच्या प्रभावाखाली तो गांधीजींबाबत जाणून घेण्यासाठी तो पुस्तकं वाचतो. याच दरम्यान त्याला गांधीजींचा आत्मा भासतो आणि त्यांच्याकडून तो खऱ्या अर्थाने अहिंसा, सत्य, संयम आणि क्षमाशीलतेचे धडे शिकतो. हीच शिकवण पुढे त्याच्या आयुष्यातील आणि इतरांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपयोगी ठरते.

या चित्रपटाची खासियत म्हणजे तो उपदेश न करता सहजतेने गांधीवाद मांडतो. प्रेक्षकांना हसवता हसवता तो त्यांना विचार करायलाही लावतो. ‘गांधिगिरी’ हा शब्द प्रेक्षकांच्या आयुष्यात इतका रुजला की अनेकांनी प्रत्यक्षात आपले वर्तन बदलले. राजकारण, समाज आणि दैनंदिन आयुष्यात वाद न मांडता संवाद साधण्याचा आणि संयमाने समस्यांचे निराकरण करण्याचा संदेश या चित्रपटातून मिळतो.

कोणी साकारली होती महात्त्मा गांधींची भूमिका?

दरम्यान, या सिनेमातील महात्मा गांधींची भूमिका देखील अतिशय महत्त्वाची होती. लगे रहो मुन्ना भाईमध्ये महत्त्मा गांधी यांची भूमिका अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारली होती. विशेष म्हणजे शूटिंग संपल्यानंतर दिलीप प्रभावळकर मेकअप शिवाय संजय दत्तसमोर आले तेव्हा संजय दत्तने त्यांना ओळखलं देखील नव्हतं.

चित्रपटातील संजय दत्तने साकारलेला मुन्ना आणि अरशद वारसीचा सर्किट हे पात्रं अतिशय प्रभावी ठरले. विद्या बालन हिने रेडिओ जॉकीची भूमिका अप्रतिम साकारली. गांधीजींची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी केली असून त्यांच्या सहज वावरामुळे प्रेक्षकांना खऱ्या गांधीजींचा भास होतो. संगीत, विनोदी प्रसंग, भावनिक क्षण आणि ताकदीची पटकथा यामुळे चित्रपटाला अपार यश मिळाले.

‘लगे रहो मुन्ना भाई’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर एक सामाजिक आंदोलन ठरला. महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाची सांगड आधुनिक काळाशी कशी घालता येते, हे या चित्रपटाने दाखवून दिले. आजही हा चित्रपट पाहिला की मनात सकारात्मकता आणि आशा जागते. त्यामुळे हा चित्रपट भारतीय सिनेमातील एक मैलाचा दगड मानला जातो.

इतर महत्त्वाच्या बातम्या

📚 Related News