: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना-मनसे युतीच्या घडामोडींना वेग आला असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची देखील आज बैठक संपन्न झाली. मनसेच्या नेते मंडळींची बैठक झाली असून 5 तारखेची बैठक आज करण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शाखा अध्यक्ष नेमणूक, बीएलओची नेमणूक हे मुद्दे बैठकीत होते. तर, काल राज ठाकरेंच्या आई या उद्धवजीच्या मावशी आहेत, त्यांना भेटण्यासाठी ते आले होते. त्यांच्यात बोलणे झाले, साहेबांबरोबर पण त्यांचे बोलणे झाले असे म्हणत दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटे राजकीय चर्चा झाल्याचे यांनी सांगितले.
राज ठाकरे आणि उद्वव ठाकरे यांच्या 5-10 मिनिटे चर्चा झाली. तुम्ही सतत बातम्या दाखवत आहात, त्यामुळे तशी देखील चर्चा झाली असेल. मी काही तिथे नव्हतो, इतर कुणीही नव्हते. त्यामुळे नेमकी काय चर्चा झाली, हे मला माहिती नसल्याचे बाळा नांदगावकर यांनी म्हटले. ठाकरे बंधू, दोघे भाऊ मनाने एकत्रित येताना आम्हाला दिसत आहेत, त्यांचा एक पक्ष आहे आमचा एक आहे. शिवसेनेची परंपरा आहे की ते दसरा मेळावा करतात, आम्हीही आमचा पक्ष स्थापन केल्यापासून गुढी पाडवा मेळावा करतो. आपले आपले विचार आपल्या मंचावरून मांडतो. त्यामुळे मला असे वाटत नाही की त्यांनी काही निमंत्रण दिले आहे, ते दोन्ही नेते एकमेकांच्या मंचावरून बोलतील, असेही नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
शिवसेना मविआतून बाहेर पडणार का?
शिवसेना-मनसे युतीसाठी उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार का, असा प्रश्न बाळा नांदगावकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर, एकंदरीत उद्धव ठाकरेंची यांची भूमिका बघितली तर ते दोघे भाऊ एकत्रित येण्याच्या दृष्टीने आहे. त्यासाठी ते काहीही निर्णय घेऊ शकतील. परंतू,अजून या मुद्यावर चर्चा नाही, असे म्हणत बाळा नांदगावकर यांनी मोठे सूतोवाच केले आहेत. तसेच, मनसे मविआत सामिल होणार का? कॉग्रेससोबत जाणार का? असाही प्रश्न नांदगावकर यांना विचारला असता, हा हायकमांडचा विषय आहे, त्यावर ते बोलतील. पण, विचारसरणीचा मुद्दा असतो, ध्येयधोरणाचा मुद्दा आहे. दोन पक्ष अजून एकत्र आलेले नाहीत, त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही, असेही मनसे नेत्याने स्पष्टपणे सांगितले.
अजून काहीच झालेले नाही, त्यामुळे जर तर वर काय बोलणार. कोणताही पक्ष स्थानिक पातळीवरच्या लोकांशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चर्चा करत असतोच. दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने बोलताना, आमचा गुडीपाडव्याचा मुहूर्त आहे, ते त्यांची भूमिका मांडतील आणि आम्ही ऐकू असेही नांदगावकर यांनी म्हटले. आम्ही निवडणूक आयुक्तांची वेळ मागितली असून आम्हाला सोमवारची वेळ मिळाली आहे.