Mumbai Crime News : मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याचे समोर आले आहे. वेगवान गाडीच्या टपावर बसून तरुणांकडून रस्त्यावर धिंगाणा घालण्यात आला आहे. सोशल माध्यमातून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी मध्यरात्री धिंगाणा करणारे टायगर ग्रुपच्या सदस्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे. टायगर ग्रुपचे सदस्य रोमिओ राठोड आणि संतोष राठोड सोबत स्कोडा गाडी चालकाचा विरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, या टायगर ग्रुपने स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच्याही जीवाला धोका पोहोचवण्याचा प्रकार केला आहे. सध्या एमआयडीसी पोलिसांनी हुल्लडबाजी मध्ये वापरण्यात आलेली स्कोडा कार जप्त केली आहे. या कार्यकर्त्यांच्या व्हिडिओ बनवायचं मागे हेतू काय होता? त्यासोबत परिसरात या व्हिडिओच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचं उद्देश होता का? या संदर्भात एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.






