Parbhani Crime News : देशभर दिवाळीचा सण मोठ्या उत्साहत साजरा होत आहे. यासणात मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जातात. मात्र, परभणी जिल्ह्यात फटाके वाजवण्यावरून दोन गटात झाला आहे. फुटाक्याच्या मुद्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झालीय. यामध्ये 9 जण जखमी झाले आहेत.
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहीला पिंपरी गावात ही घटना घडली आहे. दोन्ही गटाच्या 20 जणांवर बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहीला पिंपरी गावात फटाके वाजवण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. यामध्ये 9 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटाच्या 20 जणांवर बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळीनिमित्त फटाके वाजवत असताना छोट्या मुलांमध्ये झालेले भांडण मोठ्या माणसात गेले.
यातूनच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. यात एकूण 9 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने वाद शमला. या प्रकरणी दोन्ही गटातील 20 जणांवर बोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांमध्ये फटाके वाजवण्यावरुन झालेला वाद पुन्हा मोठ्या माणसांमध्ये लक्ष्मी पूजनाच्या रात्री जिंतूरच्या रोहीला पिंपरी गावात लहान मुलांमध्ये फटाके वाजवण्या वरून भांडण झाले ही भांडण मोठ्यांमध्ये पोचली आणि दोन गटात अक्षरशः तुंबळ हाणामारी झाली ज्यात एकूण ९ जण गंभीर जखमी झाले पोलिसानी तत्काळ गावात पोचत दोन्ही शांतता बैठक घेतली आणि वाद शमला मात्र मागच्या ३ दिवसांपासून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणात दोन्ही बाजूच्या परस्पर विरोधी तक्रारी घेवून २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. दिवाळी सण हा आनंद आणि प्रकाशाचा उत्सव आहे आणि या दरम्यान फटाके वाजवणे हा एक सामान्य भाग आहे, जो विशेषतः मुलांना आणि तरुणांना उत्साहित करतो. मात्र, यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषण आणि वायू प्रदूषणाच्या समस्या लक्षात घेऊन, अनेक ठिकाणी फटाके वाजवण्यासाठी नियम व वेळेची मर्यादा निश्चित केली जाते. प्रदूषण नियंत्रणासाठी अनेकदा 'हिरवे फटाके' वापरण्यास प्रोत्साहित केले जाते आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते.
दरम्यान, हे फटाके वाजवण्याच्या मुद्यावरुन अनेकदा वाज देखील होतात. असाच वाद जिल्ह्यात झाला,. लहान मुलांचा वाद मोठ्या माणसांपर्यंत गेला. यामध्ये हाणामारी झाल्याने 9 जणजखमी झाले आहेत.






